बुध्द – धम्मगीतांची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली
नागपूर :- संगीत क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करून सातासमुद्रापलिकडे देशाचे नाव गौरवान्वित करणारे नागपुरातील ज्येष्ठ संगीतकार व प्रसिद्ध व्हायोलिन वादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
नागपुरातील इंदोरा परिसरातील वडिलांनी सुरू केलेल्या भास्कर संगीत विद्यालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते आकाशवाणीचे ‘अ’ श्रेणीचे कलावंत होते. जपानला झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत समारोहात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. देशातील ते एक नामवंत असे संगीततज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. अनेक चित्रपटातील गीतांना त्यांनी संगीत दिले. बुध्द – धम्मगीतांची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केल्याचेही डॉ. राऊत म्हणालेत.
पं. धाकडे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. व्हायोलिन वादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.