नागपूर :- राज्यातील खाजगी व सहकारी दूध प्रकल्पांना गायीच्या दुधाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना थेट अनुदानाचा लाभ देणारी योजना 10 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आली होती. परंतु शासनाने या योजनेला दि 10 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
संकलित होणाऱ्या दूधासाठी उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी बँकेमार्फत प्रकल्पांना विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करुन देण्यात आले असून दूध उत्पादकांनी त्यांच्या दुभत्या जनावरांची माहिती या पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रादेशिक किंवा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नागपुरचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय अधिकारी यांनी केले आहे.