आधारभूत किंमत धान खरेदी खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ

भंडारा :- शेतकऱ्यांना आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही 30 हजार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 7 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर 7/12 उतारा, आधार कार्ड, बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत या कागदपत्रासह मुदतीआधी जाऊन नावाची नोंद करावी, असे आवाहन पणन विभागाने केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेच्या माध्यम समन्वयासंदर्भात बैठक

Sat Dec 3 , 2022
नागपूर :- भारतीय विज्ञान परिषदेचे ( इंडियन सायन्स काँग्रेस ) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यम समन्वयासंदर्भात आढावा बैठक नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू एस.आर.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विज्ञान परिषदेचे स्थानिक सचिव जी.एस. खाडेकर, राजेश सिंग, जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com