– कोतवाल बरडी -एनवीरा परिसरातील फटाकेचे वाती (गनपावडर) बनविणाऱ्या कंपनीत स्फोट
– दोन जणांचा मृत्यू, ४/५ कामगार जखमी
– दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमुळे मोठी दुर्घटना टळली
बाजारगाव/कळमेश्वर :- नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसीलमधील कलमेश्वर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या राऊळगाव- कोतवाल बरडी -एनवीरा गावाजवळ, एशियन फायर वर्क्स एक्सप्लोझिव्हज या फटाके उत्पादक कंपनीत आज दुपारी १.३० ते २ च्या दरम्यान झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. ४ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरपासून ४७ किमी अंतरावर कोतवाल बर्डी आणि राळेगावजवळील एन्विरा गावाजवळ आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, जेवणाच्या सुट्टीच्या वेळी, अनेक पुरुष/महिला कर्मचारी जेवण घेत होते. तेव्हा हा स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये १) भूरा लक्ष्मण रजक (२५), रा. भिल्मा. शिवानी, २) मुनीत मडावी (३१), मु घुंनटी, तह मंडला, शिवानी आणि जखमींमध्ये सौरभ मुसळे (२५, रा. डोर्ली), साहिल दिलावर शेख (२६), घनशाम लोखंडे ५५, रा. डोर्ली, तहसील काटोल, जिल्हा नागपूर यांचा समावेश आहे. या कंपनीत ५० पुरुष आणि महिला कामगार काम करत असल्याचे सांगितले जाते. १६फेब्रूवारी रोजी १६ पुरुष आणि १७ महिलांसह एकूण ३३ कर्मचारी कामावर आले. ते जेवणासाठी गेले होते मात्र या पैकी दोन्ही मृतक काम उरकून योतो असे म्हणत मिक्सिंग चे काम करत होते. यातच त्यांचे वर काळाणे घाला घातला. दोन्ही कामगार म. प्र. चे शीवनी जिल्ह्यातील कामगार होते.
घटनेची माहिती मिळताच कळमेश्वरचे पोलिस ठाणेदार मनोज काळबांडे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले . अग्निशमन व रूग्णवाहिकांना पाचारण केले. घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, काटोल उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार राजीव रणवीर, उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल मस्के,बीडीओ गुंजकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, सलील देशमुख आणि इतर नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेतील मृतांना चामूंडा एक्सप्लोजिव्ह व सोलार एकस्पोलिव,इंडस्ट्रीज चे घटनेतील मृतांना मिळालेल्या मोबदला प्रमाणे या दोन्ही गरजू कामगारांचे कुटुंबीयांना देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.