गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 चे कालावधीत उमेदवारांकडून किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधींकडून होणाऱ्या दैनंदिन खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याकरीता विधानसभा मतदारसंघानिहाय निवडणुक खर्च पथक तसेच लेखा पथकांची नेमणुक करण्यात आलेली आहे व त्यांना खर्चाचे अनुषंगाने लेखे विहित मुदतीत काटेकोरपणे नोंदवावयाचे आहेत.
निवडणूक खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल हे दि. 2, 8 व 17 एप्रिल 2024 रोजी निवडणुक खर्च लेख्यांचे निरीक्षण करणार आहेत. त्याअनुषंगाने संबंधित लेखे अद्ययावत ठेवण्याचे व कोणत्याही प्रकारची हयगय होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी दिल्या आहे.