– आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे आयोजन
नागपूर :- महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रोजगार व रोजगाराच्या संधी यावर भर देण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे नमो महारोजगार मेळाव्यात विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे दालन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उघडण्यात आले.
मेळाव्यामध्ये आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठात चालनाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेतली. कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध रोजगाराच्या संधीची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहितीसुद्धा देण्यात आली. या दालनाद्वारे विद्यापीठ स्तरावर सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्यधिष्ठित उपक्रमाचे महत्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, विद्यापीठाचे प्रशिक्षण व रोज़गार अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी उपक्रमाबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. विभागाचे संचालक डॉ. निशिकांत राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. विभागाचे सहा. संचालक डॉ. समित माहोरे, विभागातील प्रकल्प अधिकारी डॉ. अमित झपाटे आणि निलेश उईके व प्रितेश शिरसुदे यांनी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. याप्रसंगी विविध अभ्यासक्रमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये राष्ट्रीय अग्निसुरक्षा अभियांत्रिकी संस्था (NAFS) चे संजय बावणे, मंगेश निनावे, श्री साई समर्थ शैक्षणिक व मेडिकल सोसायटी संस्थेचे तेजस जोशी, वेदिक(VEDIC)(VDIH) चे माधवी मॅडम, नेक्सस इन्फोसेक चे सय्यद मुमताज हे उपस्थित होते. पुढील उपक्रमासाठी कुलगुरु महोदयांनी सदिच्छा व्यक्त केल्या.