कांद्रीत मादी बिबट आढळुन आल्याने खळबळ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- वेकोलि कामठी खुली कोळसा खदान ने कांद्री वार्ड क्र. २ च्या लोकवस्ती जवळील नाल्यालगत ओबी माती डम्पींग केली आहे. त्याच नाल्याजवळ सकाळच्या सुमारास मादी बिबट आढळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभाग व पोलीस विभागाचे पाचारण करण्यात आले होते.

प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.४) मे ला सकाळच्या सुमारास नागरिकांना मादी बिबट आढळुन आल्याची माहिती कांद्री गावात वा-या सारखी पसरताच नागरिकांनी बिबट ला पाहण्याकरिता नाल्याजवळ एकच गर्दी केली होती. आपदा मित्र श्याम मस्के यांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना व वनविभाच्या अधिका-यांना दिल्याने संबधित अधिका-यानी घटना स्थळी पोहचुन नागरिकांच्या जमलेल्या गर्दी ला कमी करुन बिबट ला रेस्क्यु करण्याचा प्रयत्न केला. परंतु सायंकाळ पर्यंत वनविभागाच्या अधिका-याना बिबट ला पकडण्यात यश आले नाही. परंती वनविभागाचे कर्मचारी त्याला पाहण्यास (पाहतीवर) ठेवण्यात आले आहे. अशी माहिती सुत्राकडुन प्राप्त झाली आहे.

वेकोलि कामठी खुली कोळसा खदान व्दारे कांद्री गावाला लागुनच असलेल्या नाल्या लगतच ओबी माती डम्पींग करून उंच टेकडया तयार करण्या त येत असल्याने हा नाला छोटा झालेला आहे. पाण्या च्या शोधात गावातील आणि जंगली प्राणी येथे पाणी पिण्याकरिता येत असतात त्याच प्रमाणे मंगळवार ला या कांद्रीच्या नाल्यात बिबट चे नागरिकांना दर्शन झाल्याने लागुनच असलेली कांद्रीच्या लोकवस्ती मधिल नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदी ३.० मंत्रिमंडळाचा शनिवारी शपथविधी? ‘रालोआ’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड

Thu Jun 6 , 2024
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘एनडीए’तील घटक पक्षांना विश्वासात घेऊन केंद्रातील मोदी ३.० सरकारचा मार्ग सुकर केला. पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोदींची ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली. या बैठकीमध्ये, केंद्रात सरकार स्थापनेचा दावा तातडीने करण्याची विनंती मोदींना करण्यात आली. ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पाठिंब्याचे लेखी पत्रही दिले असून मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी ८ जून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com