बंगलोर विद्यापीठ युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाच्या चमूची उत्कृष्ट कामगिरी

अमरावती :- जैन विद्यापीठ, बंगलोर (कर्नाटक) येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने उत्कृष्टरित्या कामगिरी करीत विद्यापीठाचे नाव उंचावले. सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले.

उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्याथ्र्यांमध्ये शास्त्रीय वाद्य संगीत तालवाद्य या प्रकारात सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा पवन सिडाम, साथिदार श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा ऋषिकेश दुधाळे यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त केला. फाईन आर्ट (पोस्टर मेकिंग) स्पर्धेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची रुद्राणी बारब्दे हिने व्दितीय, वादविवाद स्पर्धेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अकोलाची  सकिना अली व श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची गौरी ककरानिया यांनी व्दितीय, पाश्चिमात्य समूहगान स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाची स्वरश्री केतकर, महिला महाविद्यालय, अमरावतीची निकिता मोने, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची दिव्या बसोले व क्रिश आत्राम, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा राहुल पवार, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा वेदांत उमरे यांनी तृतिय क्रमांक मिळविला. साथिदार म्हणून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे श्री सर्वेश पाठक, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा ऋषिकेश दुधाळे, अभिजित भावे यांनी भूमिका बजावली.

विद्यापीठ अधिसभागृहात सत्कार

यशस्वी विद्याथ्र्यांचा अधिसभागृहामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, प्रशासन विभागाचे कुलसचिव मंगेश वरखेडे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, डॉ. सोपान वतारे, चमू व्यवस्थापक डॉ. सारिका श्रावणे यांनी यशस्वी विद्याथ्र्यांचा सत्कार केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा वैद्यकीय आघाडीद्वारे आरोग्यशक्ती पुरस्कार उत्साहात संपन्न

Sat Mar 4 , 2023
नागपुर :- भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर व मुंबई ओंकॉकेअर नागपूर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन सप्ताह निमित्ताने नागपूरात आरोग्य क्षेत्रात महिलासाठी ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या महिला डॉक्टर्सला माजी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे यांचे हस्ते आरोग्यशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक युगात स्त्रीशक्ती ही जगाचे नेतृत्व करत असून महिला डॉक्टर्स ह्या आपल्या वैद्यकीय सेवेतून समाजातील दुर्बल महिलांना सशक्त, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com