– संदीप कांबळे, कामठी
कामठीत वाढली एकच क्रेझ;’मै झुकेगा नहीं साला’
कामठी च्या गोयल टॉकीज चित्रपटगृहात सतत 9 आठवडे पुष्पां चित्रपट प्रदर्शित
कामठी ता प्र 23:- आजच्या स्पर्धात्मक युगात चित्रपट सृष्टीचे पडसाद तरुण पिढीवर चांगलेच उमटत आहेत यानुसार कोणत्या चित्रपटांना प्रेक्षक डोक्यावर घेतील हे सांगता येत नाही.कामठी च्या गोयल चित्रपट गृहात मागील दोन महिन्यांपूर्वी पासून प्रदर्शित झालेला प्रसिद्ध चित्रपट ‘पुष्पां’ या हिंदो चोत्रपटाची क्रेझ इतकी वाढली की या चित्रपटातील ‘मै झुकेगा नही साला” ही डॉयलॉग चांगलीच प्रसिद्ध झाली असून कामठी तालुक्यात या डॉयलॉग चा चांगलंच क्रेझ वाढला असून तरुणापासून ते वयस्का पर्यंत चित्रपटाचे अभिनेता अल्लु अर्जुन प्रमाणे स्टाईल मारणे सुरू झाले असून विविध स्टाईल मधून ‘मै झुकेगा नहीं साला’चा स्टायलिश व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.तर कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात ‘पुष्पां’ची क्रेज चांगलीच वाढली असून गल्लीबोळातही ‘मै झुकेगा नहीं साला’या डॉयलॉग ची चर्चा होत आहे. तर या चित्रपटाचा ज्वर सर्वत्र पसरला त्यातच कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अविनाश उकेश यांनाही मोह आवरला नाही आणि यांनी सुदधा ‘पुष्पां’च्या क्रेझ चा स्वतःचा फोटो सोशल मोडियावर व्हायरल करीत आगामी निवडणुकीत पुन्हा उभे राहणार असा इशारा देत ‘मै झुकेगा नहीं साला’.या डॉयलॉग मधून निवडणुकीचे शिंगुर फुकले आहे.
गेल्या डिसेंबर मध्ये साऊथचा अभिनेता अल्लु अर्जुन व रश्मीका मंथाना यांचा पुष्पां हा चित्रपट प्रदर्शित झाला असून कामठी येथील गोयल टॉकीज मध्ये सतत 9 आठवडेच्या वर अर्थात 23 फेब्रुवारी पर्यंत हाऊसफुल चालत आहे तर चित्रपट शौकिनानी हा चित्रपट 2 ते 3 वेळा पाहिला आहे.संपूर्ण चित्रपट हा जंगली वातावरणात दाखविला असला तरी रक्तचंदनाच्या तस्करी बाबत या चित्रपटात अनेक गोष्टी अनुभवायला मिळाले.या चित्रपटातील अनेक डॉयलॉग चर्चेचे ठरले आहेत. जसे ‘पुष्पां नाम सूनके फ्लावर संमझे क्या, फ्लावर नहीं फायर है,’राज करणे आया मै’यासह ‘इज्जत का सवाल है तसेच लॉग काम के पैसे देते इज्जत देने के नहीं, ‘उससे बोल इज्जत खरीदके माथे पे चित्टका, मै नहीं बदलणे वाला हु, नोकरी बदल डालो असे अनेक डॉयलॉग संवादमध्ये उपयोगात आणल्या जात आहेत तर सोशल मिडियावरही या चित्रपट गृहातील डॉयलॉग व्हायरल होऊ लागले आहेत.
अभिनेता अल्लु अर्जुनप्रमाणे हेअर स्टाईल अनेक तरुण तसेच मुलेही करताना दिसू लागले आहेत तसेच या चित्रपट गृहातील गाणेही अनेकांच्या तोंडुन गुण गुंणताना दिसत आहेत .एकंदरीत पुष्पां या चित्रपट गृहाची क्रेज कामठीत चांगली वाढली असून या चित्रपटाचा बहुतेक प्रेक्षकांना पुष्पां चा ज्वर चढल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स;-प्रकाश गोयल-यासंदर्भात गोयल टॉकीज चे व्यवस्थापकीय अधिकारी प्रकाश गोयल यांनी संगीतले की कोरोना काळातही प्रसिद्ध झालेल्या या पुष्पां चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून हा चित्रपट 9 आठवड्यापेक्षा अधिक काळ सतत सुरू आहे आणि प्रेक्षकांची भर कायम आहे याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.