संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सर्वांनी आपसी मतभेद विसरून सहकार्य केले तर गावाचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांनी येरखेडा ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच पदाच्या पदभार स्वीकारण्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले नुकत्याच सहा जानेवारीला झालेल्या येरखेडा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित गटाच्या मंदा प्रमोद महलले पाटील चुरशीच्या लढतीत काँग्रेस समर्थित गटाच्या उमेदवाराचा पराभव करून उपसरपंच पदी विजयी झाले होते त्यांनी आज उपसरपंच पदाचा पदभार आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारला .
यावेळी सरपंच सरिता रंगारी ,नागपूर जिल्हा परिषद चे माजी विरोधी पक्ष नेता अनिल निधान ,जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे ,माजी उपसभापती उमेश रडके, कामठी तालुका भाजपा अध्यक्ष किशोर बेले ,कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्ष व माजी सरपंच मंगला कारेमोरे ,माजी उपसभापती देवेंद्र गवते,माजी सरपंच मनीष कारेमोरे, मौदा चे माजी उपसरपंच मोरेश्वर सोरते, कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रमोद बाबा महले पाटील भास्करराव वटपल्लीवार, उमेश महल्ले, राजेंद्र चौरे , सुषमा राकडे, सरिता भोयर उपस्थित होते .
तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अनिल भोयर ,आचल तिरपुडे, नरेश मोहबे, राजश्री धिवले, प्रिया दुपारे, ज्योती घडले यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार टेकचंद सावरकर , अनिल निधान, मोहन माकडे म्हणाले केंद्रात मोदी सरकार व राज्यात शिंदे फडणवीस सरकार असल्यामुळे विकास कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नसून त्याकरिता आपण सर्वांनी आपसी मतभेद विसरू विकास कामासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र चौरे यांनी केले संचालन सुषमा राकडे यांनी केले .आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी जितेंद्र ढवळे यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.