शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि निर्णय घेतले जातील 

– उद्यान‌ विद्या महाविद्यालय व शेतकरी हितासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार चरणसिंग यांचे प्रतिपाद

काटोल :- काटोल विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रातील पंतप्रधान मोदी यांचे सरकार व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुती चे सरकार शेतकऱ्यांचे हितासाठी वचनबध्‍द आहे,. काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र हे शेतकरी व युवा ‌शेतकर्यांना 🍊 संत्रा /मोसंबी बागायतीं सह अन्य फळ बागायती चे नव नवीन वाण (प्रजातींचा) शोधून काढून ती वाण शेतकऱ्यांचे शेतात पोहोचले पाहिजे. या संशोधनात्मक अभ्यास अभ्यासपूर्ण माहिती साठी लागणारे विकास निधीची कमी पडू देणार नाही अशी ग्वाही नव निर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर यांनी काटोल यथेल फळ संशोधन केंद्रावर आयोजित संत्रा मोसंबी व अन्य फळबाग उत्पादक शेतकरी यांचे मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शेतकरी व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख, वनराई चे अध्यक्ष माजी आमदार गिरीश गांधी, माजी कुलगुरू एस डी मायी, काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे, नरखेड चे माजी सभापती नरेश अरसडे, संचालक मोरेश्वर वानखेडे, मनोज जंवजाळ डॉ अनिल ठाकरे, किशोर गाढवे,बाल किसन पालीवाल, प्रविण लोहे, बबलू बिसेन, तसेच कृषी उपसंचालक, जिल्हा कृषी अधिकारी, तसेच पी के व्ही चे डॉ पंचभाई,एस आर पाटील, यांचे सह कृषी विद्यापीठाचे व पी के व्ही व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल चे सर्व अधिकार व शेतकरी उपस्थित होते.

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल चे वरिष्ठ अधिकारी डॉ मेघना डहाळे यांनी प्रास्ताविक केले . प्रास्ताविके मधून काटोल फळ संशोधन केंद्रामधून संत्रा मोसंबी सह अन्य फळ बागायती शेती चे शेतकर्यांना देण्यात येणारी माहिती सांगतानाच येथे आवश्यक तांत्रिक अवजारे तसेच मुलभूत व पायाभूत सुविधांची मागणी करण्यात आली.

*उद्या विद्या महाविद्यालय सुरू करण्यासाठी नीधी उपलब्ध करून देण्यात येईल*

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल (वंडली ) हे अंदाजे १८०एकर जागेवर ‌असुन संत्रा ,मोसंबी,पेरू, आवळा, या सारखे फळ बागायती शेती उत्पादनासाठी नव नवीन वाण विकसित केली जातात. येथे जागा ही मुबलक आहे. येथे उद्यान विद्या महाविद्यालय सुरू करण्यासाठी मागणी फार जूनी आहे. मात्र येथे विद्या उद्यान महाविद्यालय सुरू करण्यासाठी लागणारी नियमावली व विकास निधी उपलब्ध करूनच व उद्यान विद्या महा विद्यालय सुरू करावे असे परखड मत माजी व्हाईसचांसलर डॉ ‌‌ एस डी मायी यांनी आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथील कार्यक्रमात शेतकरी हितांसाठी विविध योजनांवर प्रकाश टाकला माजी आमदार व वनराई अध्यक्ष गिरीश गांधी , संचालक वानखेडे, मनोज जंवजाळ यांनी संत्रा मोसंबी बागायतींचे उन्नती बाबद आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ प्रदिप दवणे यांचा सत्कार

या प्रसंगी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल वंडली येथे कृषी शास्त्रज्ञ म्हणून उत्कृष्ट सेवा दिली व सेवानिवृत्त नंतर आमदार चरणसिंग ठाकूर व कुलगुरू डॉ गडाख तसेच डॉ मायी यांचे हस्ते सापत्निक सत्कार करण्यात आला.

 *निधी कमी पडू देणार नाही* 

उद्यान‌ विद्या महाविलयल सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व शेतकरी हितासाठी झटणारे देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्याने नीधी ची कमतरता भासू देणार नाही. मी आमदार नसून हा कामदारा आहे शेतकरी सुखी तर आपला देशच सुखी नाहितर सर्व जग सुखी होईल असे अभिवचन आमदार चरणसिंग ठाकूर यांनी दिले.तसेच कृषी उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकला.

या प्रसंगी काटोल तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमात पी के व्ही तसेच नागपूर जिल्ह्याचे कृषी अधिकारी, तालुक्यातील कृषी अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ‌शेतकरीउपस्थित होते.

देशात अन्नधान्य उत्पादन करुन देशाचे सुरक्षेसाठी रात्रंदिवस परिश्रम करणा-या आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचे हित साधण्‍यासाठी आमचे सरकार कोणतीही कसर ठेवत नाही. या मधे संत्रा/मोसंबी ‌व अन्य फळ बागायती असो‌ याकरिता मुख्यमंत्री ‌देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे हितासाठी घेतलेल्या अशा अनेक निर्णयांचा खूप मोठा लाभ आपल्‍या अन्‍नदाता शेतक-यांना होणार आहे. यामुळे एकीकडे त्यांचे उत्‍पन्न वाढेल, तसेच ग्रामीण क्षेत्रांमध्‍ये सायकल रोजगाराच्या संधीही वाढतील.’’ असे ही चरणसिंग ठाकूर या प्रसंगी मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Tue Dec 10 , 2024
नागपूर :- दिनांक ०९.१२.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून रू. ८८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०२ कैसेसमध्ये ०३ ईसमावर कारवाई करून रू. १,४१०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,९५४ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com