संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्ष
कामठी :- कामठी शहरातील विविध भागात पाण्याच्या पाईपलाईन लिकेज असून या दुरुस्तीकडे संबंधित कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्ष आहे तर या गळत्तीतून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.
कामठी शहरात बहुतांश ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटली असून नेमून दिलेल्या विभागातील कंत्राटदार आपली कामे योग्य पद्धतीने करीत नसल्यामुळे व फुटलेल्या जलवाहिन्यांची तात्काळ दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना मिळणारे पाणी वाया जात आहे .त्यामुळे पाणी वाचवा मोहीम फक्त कागदावरच दिसून येत आहे.यासोबतच या फुटलेल्या लिकेज पाईप लाईन मध्ये वाहणारे सांडपाणी शिरत असल्यामुळे नागरिकांना नाईलजास्तव दूषित पाणी पुरवठा होत आहे ज्यामुळे शहरात रोगराईला निमंत्रण मिळत आहे