महाविकास आघाडीची आजही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

नागपूर दि. २० डिसेंबर – राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… ५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचं करायच काय खाली डोकं वर पाय…खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत आज दुसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसर दणाणून सोडला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नाशिकला 1600 कोटीच्या मेट्रो प्रकल्पाचे गिफ्ट - गडकरींची मोठी घोषणा

Tue Dec 20 , 2022
नाशिक  : नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिककरांसाठी महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाविषयी घोषणा केली आहे. नाशिकमध्ये लवकरच १६०० कोटींचा मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्याचे काम दोन टप्प्यांत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ कि.मी. लांबीच्या १८३० कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि कोनशिला अनावरण रविवारी (ता. १८) गडकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!