भारतीय रियल एस्टेट सलाहकार वेल्फेअर युनियनची नागपूरला स्थापना

नागपूर :- राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, व भारतीय यूवा दिवस यांची प्रेरणा घेत भारतीय रियल इस्टेट सलाहकार वेल्फेअर असोसिएशन/युनियन, नागपूरची स्थापना करण्यात आली. अत्यंत महत्वपूर्ण अशी नविन घटना आज नागपूरच्या ईतिहासात घडत आहे. महाराष्ट्र शासनाचा महारेरा कायदा जो ग्राहक हित, बिल्डर व डेव्हलपर आणि रियल इस्टेट सलाहकार या तिघांच्याही हिताचे रक्षण करण्यासाठी प्रस्थापित करण्यात आला आहे एवढे असूनही ब-याच गोष्टी ज्या ग्राहक व बिल्डर्सच्या हितात तर होत आहेत पण अजूनही जो महत्वाचा दूवा असणारे रियल इस्टेट सलाहकार त्यांच्या हितात होत नाहि. त्याकरिता त्यांच्या हितात कायदे समजावून सांगणे, प्रशिक्षण देणे, वेळोवेळी कायद्याची अंमलबजावणी झाली असली तरी त्यावर अंकुश ठेवणे आणि ग्राहक किंवा बिल्डर व डेव्हलपर द्वारे होणारी फसवणूक टाळणे व सलाहकारांच्या वेल्फेअरसाठी या असोसिएशनचे गठन करुन नवनिर्वाचित कार्य समितीचे गठन व नविन कार्यालयाचे उद्घाटन मयंक सराफजी चार्टर्ड अकांऊटट यांचे हस्ते पार पडले. संस्थापित अध्यक्ष राजविरसिंह यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या युनियनचे विधिवत उद्घाटन, पंजिकरण व कार्यनियोजन या पवित्र दिवसाने सुरुवात केली. युनियन द्वारे अपिल करण्यात येते की, नागपूर क्षेत्र व ईतर सर्व रियल इस्टेट सलाहकार जे या क्षेत्रात काम करतात त्या सर्वांनी या युनियन मध्ये आपले पंजिकरण करुन युनियनचे हात बळकट करावे. याप्रसंगी डॉ.के एम सुरडकर कार्यकारी अध्यक्ष, संजय कृपाण / संजय खोब्रागडे उपाध्यक्ष, मोहन बळवाईक-सचिव, मनोज गोडशेलवार -सहसचिव, अनिल सोनकुसरे -कोषाध्यक्ष, प्रशांत निनावे -सहकोषाध्यक्ष, आनंद कोहाड/संजय सोनारकर-प्रवक्ता व मिडिया प्रभारी, लक्षण चुटे -डिजीटल/प्रिंट मिडिया प्रभारी, प्रदिप मनवर-नॅशनल कोऑरडिनेटर, प्रबोध देशपांडे- डिस्ट्रिक्ट कोऑरडिनेटर व सर्व सदस्य तुकाराम जंगम, आनंदराव खोब्रागडे, नमिता चोपकर, हरीश माटे, युगलकिशोर, सुरेश रामरखयानी आदि सर्व पदाधिकारी व रियल इस्टेट मध्ये काम करणारे असोसिएट बंधू आणि भगिनी ऊपस्थित होते. राजेश चौहान जनसंपर्क अधिकारी यांनी समर्पण भावनेने व स्वेच्छेने आपले स्वतःचे कार्यालय वेल्फेअर असोसिएशनला कुठलेही भाडे न आकारता ऊपलब्ध करून दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पाहणी, ‘जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीचा घेतला आढावा

Sat Jan 13 , 2024
भंडारा :- जिल्ह्यात प्रशासनामार्फत 17, 18, व 19 जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार असून या महानाट्यासाठीच्या तयारीला आढावा आज जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी घेतला. खात रोडवरील रेल्वे ग्राउंड परिसरात महानाट्यासाठी स्टेज,पाणी व विद्युत तसेच पार्किंग याबाबतचा आढावा घेतला. नगरपरिषद भंडारा यांच्यावतीने या कार्यक्रमासाठी आज मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी तयारीची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली. जास्तीत जास्त शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांनी हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!