शिक्षकदिनी धर्मराज प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचे ज्ञानदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- येथील धर्मराज प्राथमिक शाळेत (दि.५) ला शिक्षक दिनानिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनो ख्या पद्धतीने ज्ञानदान करुन शिक्षक दिन साजरा केला. यावेळी चिमुकल्यांचा उत्साह विलक्षण होता.

धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान येथे मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली उपक्रमशिल शिक्षक हर्षकला चौधरी व अपर्णा बावनकुळे यांच्या नियोजन बद्ध तेने चिमुकले विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत दिसले. शिक्षकांचे हाव भाव जसेच्या तसे रेखाटत फळ्यावर आपल्या इवल्याशा बोटांनी अक्षरांना आकार दिला.

तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणुन इयत्ता चौथीची आरोशी चंद्रशेखर मोटघरे हिने कारभार सांभाळला. तर शिक्षक म्हणुन सुहानी लिल्लारे, ओम पोट भरे, शिवम पोटभरे, अर्नवी भोयर, अन्वयी खैरकर, श्रुती रेवतकर, मयंक हुमणे, कर्तव्य हटवार, प्रांजल घरडे, वाणी चरडे, कुमुदिनी वाडीभस्मे,एकता भुते,  रिद्धी चिखले,आरोही महल्ले, रौनक पंधरे, श्रेया वैद्य, जानवी कडु, शौर्य वैद्य,आसिमा मेश्राम, अपूर्वा बोबडे, खुश खडसे,  मोनाली महल्ले, ऋषभ ढोमणे, श्रेयाणी खर्डेकर, पुर्वी सोमकुंवर, गुंजन पोटभरे, रावी डांगरे, राज खांदारे, सानिया लाडे, स्वास्तिक काळे, प्रथमेश गेचुडे, भुमिका वानखेडे, निधी भुते, मानवी वासनिक, निल भेलकर, श्रावणी घोडमारे, रूद्र गुरांदे,नंदिनी लिल्लारे यांनी भूमिका पार पाडत ज्ञानदानाचे कार्य केले. चिमुकल्यांचा शिक्षक दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक खिमेश बढिये, हर्षकला चौधरी, अर्पणा बावनकुळे, भिमराव शिंदेमेश्राम, किशोर जिभकाटे, शारदा समरीत, चित्रलेखा धानफोले, अमित मेंघरे, राजू भस्मे, प्रिती सुरजबंसी, पूजा धांडे, कांचन बावनकुळे, वैशाली कोहळे,  सुनीता मनगटे, सुलोचना झाडे,महादेव मुंजेवार आदींनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भोंदू बाबाने केला शुल्लक कारणावरून खून

Wed Sep 6 , 2023
नागपूर :- विराम गोपाळराव चंडीमेश्राम, वय ५२ वर्ष रा. आसोली ता. कामठी जिल्हा नागपुर याचा भाऊ नामे- बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा आपल्या १५ बकऱ्या चारण्याकरीता आसोली शिवारात नाग नदीच्या काठावर गेला असता आरोपी नामे भगवे कपडे घातलेला महाराज इसम वय अंदाजे ४५ वर्ष, रा. आसोली यांच्यामध्ये वादविवाद झाला त्यावरून फिर्यादीचा भाऊ जखमी हा आसोली टाटा जायका मोटर्स चाय टपरी जवळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com