शिक्षक मतदार संघ निवडणूकमधे परिवर्तन तर्फे इंजि. सुषमा भड यांची उमेदवारी घोषित.

नागपूर :- आजपर्यंत कुठल्याही शिक्षक निवडणुकीत कोणत्याही संघटनेने अथवा राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला प्राधान्य दिलेले नाही. पुरोगामी म्हणणारे पुरुष संस्कृतीचा उदो उदो करतात. टिकली लावली नाही म्हणून हिनवल्या जाते. काष्ट्राइब महासंघ व 32 शिक्षक व 70 सामाजिक सहकारी संघटनानी येणाऱ्या शिक्षक निवडणूकसाठी उच्च शिक्षित व सामाजिक चळवळीत अग्रसर असणाऱ्या इंजि. सुषमा भड यांना उमेदवारी घोषित केली आहे. यानिमित्ताने सर्व संघटना प्रमुखांना नम्र निवेदन आहे की, सध्याच्या परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र येऊन सुषमा भड या आक्रमक व अभ्यासू उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. फुले शाहू बाबासाहेबांच विचाराचे मतदार निश्चित पणे परिवर्तन घडविणार कास्ट्राईब महासंघाच्या पुढाकाराने 32 शिक्षक संघटना व 70 सामाजिक / बहूजनवादी संघटना एकत्र आल्यात व या सर्व संघटनानी पहिल्यादा शिक्षक मतदार संघ निवडणूकसाठी महिला उमेदवार इंजि. सुषमा भड यांची संयुक्त उमेदवाऱी घोषित केली. इंजि. सुषमा भड या उच्च शिक्षित असून त्यांनी DEE BA (Mlt) LL, B LLM Master In Human Rights and Duties Education PG Dip Cyber law ADCSSCA शिक्षण घेतले आहे. सुषमा भड या संघर्षशील असून समाजातील दाभीकतेवर प्रहार करतात. अन्याया विरोधात सातत्याने लढा देत आहे. अशा लढाऊ बान्याच्या उमेदवार ला उमेदवारी जाहिर केली आहे.

फुले शाहू शिवराय व बाबासाहेबांच्या विचाराशी बांधिलकी जोपसणारी व्यक्ती विधान मंडळात असणे आवश्यक आहे. आज अनेक प्रश्न आहेत, शिक्षकाना इतर कामाचा बोझा टाकण्यात येतो, नवीन शैक्षणिक धोरण मागासवर्गीय विरोधी आहे तें बदलले पाहिजे, 20 पटसंख्या शाळा बंद करण्याचे धोरण गरिबाना शिक्षणा पासून वंचित ठेवनारे आहे तें धोरण लागु होऊ देणार नाही, शालबाह्या कामे बंद झाली पाहिजे, खाजगीकरण बंद करणे, फी वाढ बंद करणे, पदवीपर्यंत मोफत शिक्षण, शिक्षणावर बजेटच्या 20% निधी राखीव असावा खाजगी ट्युशन बंद झाले पाहिजे. या मागण्यास आदर्श शिक्षण पद्धत निर्माण करणे. नागपूर शिक्षक मतदारर संघात 50% महिला असताना आजपर्यँत कुण्याही संघटनेने दखल घेतली नाही म्हणून काष्ट्राइब महासंघणे पुढाकार घेऊन महिला उमेदवार देण्याबाबत मतईक्य घडवून आणले.आपल्या विचारचे उमेदवार सत्तेत पाठविने साठी फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपसणाऱ्या संघटनानी सुषमा भड याना प्रचंड मताधिक्याने निवडून आणन्याची जबाबदारी घ्यावी. असे आव्हान करण्यात येत आहे. यावेळी अरुण गाडे अध्यक्ष कास्ट्राईब संघटना, प्रा. रमेश पिसे, इंजि. सुषमा भड, प्रा.राहुल मुन, प्रा जयंत जांभुळकर, श्यामराव हाडके, जयसिंग जाधव, रवी पोथारे, अशोक पाटील यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नितिन गडकरी से खास मुलाकात, राष्ट्रीय कॉन्टैक्टर लेबर यूनियन जोड़ो अभियान.

Tue Nov 8 , 2022
नागपूर :- पूरे भारत में राष्ट्रीय कांट्रेक्टर लेबर यूनियन जोड़ो अभियान का कार्यक्रम चालू किया गया इसमें कॉन्टैक्टर यूनियन पूरी टीम आज नितिन गडकरी केंद्रमंत्री से मुलाकात की गडकरीजीने बताया कि आपका यूनियन अच्छा काम कर रहा है इसे ज्यादा से ज्यादा आगे बढ़ाइए मैं आपको पूरा सहयोग करूंगा मजदूरों के लिए जो आप काम कर रहे हैं बहुत ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com