नागपूर :- बेसा-बेलतरोडी मार्गावरील अमरज्योती नगरातील अमर ज्योती बुद्धविहारात आज वर्षावास समापन कार्यक्रम प्रसंगी भव्य संघदान कार्यक्रम व भोजन दानाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भिक्खू शांतरक्षित महाथेरो, डॉ. भदंत धम्मशोक, भिक्खु ज्ञानज्योती, भिक्खू प्रियदर्शी, भिक्खु डॉ. धम्मोदय ह्यांनी भिक्खू संघाला व उपसकांना मार्गदर्शन केले.
भिक्खू जीवनज्योती, भिक्खू धम्मांकुर, भन्ते धम्मसेवक, भन्ते धम्मज्योती, भन्ते संघकीर्ती, भन्ते कात्यायन, भन्ते विनयकीर्ती, भन्ते शांतीदेव, भन्ते सुबोध, भिक्खू वप्प, भिक्खू पट्टीसेन, भिक्खू करुणादीप, भिक्खु धम्मधर, भिक्खू अशोकपाल, भिक्खू प्रसाद ज्योती, भिक्खू अभयज्योती, भिक्खू सह्याज्योती, भिखुनी आम्रपाली, भिक्खूनी प्रजापती, भिकुनी सुनीता, भिक्खूनी धम्मप्रिया, भिक्खुंनी यशोधरा, भिक्खुनी विशाखा, भिक्खूनी सुजाता, आदि मोठ्या प्रमाणात भिक्खू भिक्खुनी तसेच उपासक उपासीका या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भन्ते अमरज्योती हे डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांचे शिष्य होत. त्यांनी धम्मदेशना नावाने वृत्तपत्र सुद्धा चालवले होते. यावेळी अमरज्योती यांचे सुरुवातीचे शिष्य भन्ते ज्ञानज्योती व शेवटचे शिष्य भन्ते जीवन ज्योती तसेच अगदी सुरुवातीचे उपासक, तथागत धम्म प्रचार संघाचे सदस्य व कुशीनारा बुद्ध विहाराचे सहव्यवस्थापक उत्तम शेवडे या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.