नागपूर :- गोल्डन इरा मेलोडीज तर्फे विदर्भ हिंदी साहित्य संमेलनात आयोजित जुन्या गाण्यांच्या सदाबहार गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संमेलनच्या मधुरम हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आयोजक श्रीकांत ब्राह्मणे यांनी ओ जाने वाले हो सके तो लोट के आना या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर सतीश गजभिये यांनी अपनी आखो में हे गीत सादर केले. दिल ने फिर याद किया असा सूर छेडत अरुणा चौधरी यांनी श्रोत्यांना वेगळ्याच विश्वात नेले.
बहारों ने मेरा चमन लुटकर हे गीत सादर करीत श्रीकांत ब्राह्मणे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सतीश गजभिये साक्षी राऊत, मनीषा राऊत, उज्वला बोरकर, आनंद राज आनंद, तेजसिंग चव्हाण, पद्माकर मस्के यांनी 70 ते 90 च्या दशकातील सदाबहार गीतांचा नजराणा श्रोत्यांना पेश केला.