नवीन शब्दकोश निर्मितीवर भर द्यावा – लक्ष्मीकांत देशमुख

Ø भाषा सल्लागार समितीची बैठक

नागपूर :- परिभाषा कोश अभ्यासकांसाठी संदर्भ साहित्य आहे. शब्दाच्या विस्तारीकरणांमध्ये अनेक शब्दांची भर पडत आहे. शब्दकोश कालबाह्य होत नसून त्यात नवनवीन शब्दांची भर पडत असते. शब्दकोश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत यंत्रणेने त्याच्या संगणकीय प्रत उपलब्ध करून दिल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल, असे मत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभा कक्षामध्ये आज भाषा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी भाषा संचालनालयाच्या भाषा संचालक तसेच सदस्य सचिव विजया डोनीकर, सदस्य डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ.अनुपमा उजगरे, सुरेश वांदिले, जयश्री देसाई, जयंत येलुलकर, डॉ. वंदना महाजन, डॉ. मिलिंद जोशी, दूरदृष्य प्रणालीद्वारे डॉ.पंडित विद्यासागर, डॉ.केशव देशमुख, डॉ. अनंत देशपांडे यांची उपस्थिती होती.

शब्दकोश निर्मितीसाठी योजना तयार करुन कामात उच्च दर्जाची व्यावसायिकता आणण्याची गरज आहे. कालमर्यादा निश्चित करुन काम पूर्ण केली जातील याकडे लक्ष द्यावे तसेच अशासकीय व्यक्तीचीही मदत घ्यावी.

मराठी भाषेचे संवर्धन व जतन होणे महत्त्वाचे असून गेल्या 30 वर्षांमध्ये मराठी वाङ्मयामध्ये विविध बदल झाले आहेत. बोलीभाषेनुसार वाङमय तयार करण्यात येत आहे. भाषेचे संवर्धनासाठी समितीने पुढे यावे. राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करून सर्व मेट्रो स्थानकांची नावे मराठीमध्ये करावी. मराठी भाषा अभिव्यक्तीसाठी नवीन परिभाषा निर्माण, तसेच जुना परिभाषा कोश अद्यावत करण्यावर भर द्यावा, अशा सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या.

झाडीबोलीचे अभ्यासक संगीत नाट्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक हरिश्चंद्र बोरकर यांचा सत्कार व “हरिश्चंद्र माझा झाडीचा” या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आभार विजया डोनीकर यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MAHARASHTRA DIRECTORATE ADJUDGED BEST IN FLYING AT ALL INDIA VAYUSAINIK CAMP (BENGALURU)

Fri Oct 6 , 2023
Nagpur :-The Maharashtra directorate team comprising of Air Wing cadets from Nagpur, Mumbai and Pune participated in the recently concluded All India Vayusainik Camp at Bengaluru. The team comprising of 38 cadets from the three Air Wing units of Maharashtra won laurels in various competitions held during the camp. The AIVSC is the most prestigious camp for Air Wing Cadets. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com