पारडी मार्केटमध्ये सर्वसामान्यांच्या सोयीसुविधांवर भर द्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आढावा

नागपूर :- प्रस्तावित पारडी मार्केटमध्ये सर्वसामान्यांसाठी व विक्रेत्यांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधांवर विशेष भर देण्यात यावा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) दिल्या.

पारडी येथील प्रस्तावित मार्केटच्या कामासंदर्भातील पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ना. गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, मेट्रोचे संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) सीजीएम श्री. आशिष असाटी आदींची उपस्थिती होती. पारडी येथील उड्डाणपुलाचा भाग म्हणून शेजारच्या जागेवर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने भाजी व मटण मार्केट उभारले जाणार आहे. या भागात रस्त्यावर भरणारा बाजार वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरत असून त्यामुळे आरोग्याच्याही अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. बाजारपेठ एका छताखाली आणल्यास या समस्येवर मात करता येईल, या उद्देशाने ना. गडकरी यांच्या संकल्पनेतून हे मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा ना. गडकरी यांनी घेतला. ‘याठिकाणी भाजी बाजारासह मटण मार्केट, फळ मार्केट विकसित करताना जास्तीत जास्त गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था देखील असणे आवश्यक आहे. मटण मार्केटसोबत कोल्ड स्टोरेजचीही व्यवस्था करण्यात यावी. या मार्केटची संपूर्ण रचना ही सर्वसामान्यांचे हित ध्यानात घेऊनच करावी,’ अशा स्पष्ट सूचना ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या मार्केटमध्ये रेस्टॉरेंट आणि फुड कोर्टचा समावेश केल्यास आर्थिकदृष्ट्या अधिक सोयीचे ठरू शकेल, असेही ना.गडकरी यांनी बैठकीत सांगितले.

ड्रॅगन पॅलेसकडे जाणारे मार्ग वाहतुकयोग्य करा’

कामठी येथील ड्रॅगन पॅलेसकडे जाणारा अंडरपास धम्मचक्र प्रवर्तनदिनापर्यंत नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी रेल्वे विभागाला दिल्या. दोन्ही मार्गांच्या कामांचा आढावा देखील ना. गडकरी यांनी घेतला. कामठी येथील ड्रॅगन पॅलेसकडे जाण्यासाठी दोन मार्ग महत्त्वाचे असून सध्या एका ठिकाणी रेल्वेच्या वतीने आरयुबी व दुसऱ्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे आरओबीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाला याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही रस्ते २२ अक्टोबरपूर्वी वाहतुकयोग्य करून नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी दिल्या. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वसुधैव कुटुंबकम" चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आपल्या माध्यमातून सर्वत्र पोहोचेल - ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ब्रिटेनच्या भारतीयांसमोर विश्वास

Sun Oct 8 , 2023
– ओवरसीस फ्रेंड्स ऑफ बीजेपी ” कडून लंडनमध्ये हृदय सत्कार लंडन :- जगातील कोणता देश मोठा आहे, याचे मूल्यांकन त्या देशातील “सुखांक”(हॅप्पीनेस इंडेक्स) बघून निश्चित करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने आता ठरविले आहे; मला अभिमान आहे की संस्कृती आणि परंपरांमुळे संस्कारित भारत देश यामध्ये नक्कीच अव्वल स्थानावर आहे; ब्रिटेन मध्ये आपण या संस्कारित देशाचे “ब्रँड अँम्बेसिडर” म्हणून काम करताहात, ‘जियो और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com