पाच महिन्यात दोन हजारावर वीजचो-या उघडकीस

– नागपूर जिल्ह्यातील 1 हजार 695 तर वर्धा जिल्ह्यातील 436 चो-यांचा समावेश

नागपूर :- वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल 2 हजार 131 वीजचो-या उघडकीस आणल्या. यात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 160, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 907 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 1 हजार 64 प्रकरणांचा समावेश आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 1 हजार 695 तर वर्धा जिल्ह्यातील 436 विजचो-यांचा समावेश आहे. या सर्व प्रकारातून झालेल्या वीजचोरीचे मुल्य तब्बल 3 कोटी 94 लाख 69 हजार असून पैशाचा भरणा न केलेल्या वीजचोरांविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर शहर, नागपूर ग्रामिण आणि वर्धा मंडलात वीजचोरी विरोधात आक्रमक भूमिका घेत सातत्याने ठिकठिकाणी वीजचोरी विरोधात मोहीम राबविण्यात आली. यात नागपूर शहर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 110, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 566 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 465 प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल 2 कोटी 47 लाख 39 हजार इतकी आहे. यापैकी 465 ग्राहकांवर तडजोडीपोटी 18 लाख 37 हजारांचा दंड आकारण्यात आले. तर नागपूर ग्रामीण मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 20, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 239 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या 295 प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल 74 लाख 13 हजार इतकी आहे. यापैकी 275 ग्राहकांवर तडजोडीपोटी 9 लाख 17 हजारांचा दंड आकारण्यात आला आले.

नागपूर पाठोपाठ महावितरणने वर्धा जिल्ह्यात देखील वीजचोरांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवीत वर्षभरात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची 30, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची 102 तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरी 304 प्रकरणे उघडकीस आणली. या वीजचोरीचे रक्कम तब्बल 73 लाख 16 हजार इतकी आहे. यापैकी 299 ग्राहकांवर तडजोडीपोटी 10 लाख 21 हजाराचा दंड आकारण्यात आला.

अधिक वीज गळती असलेल्या वाहिन्यावर विशेष मोहीम

परिमंडलातील प्रत्येक विभागातील वीज गळती अधिक असलेल्या पहिल्या पाच वाहिन्यांवर विशेष मोहीम राबविण्यात येत असून याअंतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 12 विभागा अंतर्गत 60 वाहिनीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात शुन्य युनिट वीज वापर, 1 ते 30 युनिट आणि 1 ते 50 युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणि करण्यात येत आहे. याशिवाय या मोहीमेत नादुरुस्त मीटर देखील बदलण्यात येत आहे. यात विशेष तपासणी मोहीमेत नागपूर जिल्ह्यात 80 तर वर्धा जिल्ह्यात 97 वीज चो-या देखील उघडकीस आल्या आहे. याशिवाय कायमस्वरुपी वीजपुरव्ठा खंडित आणि पुनर्जोडणी केलेल्या 75 ग्राहकांची तपासणी करण्यात आली तर 43 ग्राहकांनी या मोहीमेत नवीन वीज जोडणी घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गड्डे में गिर कर राहगीर घायल

Wed Sep 11 , 2024
– देश के इस पर्यटन स्थल का विकास कब होगा? नागपुर :- भारत का एक मात्र पर्यटन स्थल बने मेट्रो पुल जिसमे नीचे सड़क, ऊपर रेलवे ट्रैक उसके उपर फिर सड़क (ब्रिज) और उसके उपर मेट्रो यह चित्र पूरे देश में कही भी नही है। यह ब्रिज बन कर तैयार है कामठी रोड स्थित कड़वी चौक गुरुद्वारे के पास। लेकिन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com