तेरा दिवसांत 2 हजार 509 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

नागपूर :- वीज बिलापोटी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फ़े मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असुन 1 ये 13 फ़ेब्रुवारी 2024 या 13 दिवसांत नागपूर परिमंडलातील तब्बल 2 हजार 509 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीचा त्वरित भरणा करुन होणारी गैरसोय टाळावी आणि महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

वीज खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी सर्वाधिक 1 हजार 702 थकबाकीदार नागपूर शहर मंडलातील आणि नागपूर ग्रामिण मंडलातील 463 ग्राहकांचा समावेश आहे तर यात वर्धा मंडलातील 354 ग्राहकांचा समावेश आहे. वीज खंडित करण्यात आलेल्या 2 हजार 509 ग्राहकांपैकी 1 हजार 22 ग्राहकांनी थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरुन आपला वीजपुरवठा पुर्ववत केला आहे.

वारंवार आवाहन करूनही वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणला नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करावा लागला आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राच्या प्रादेशिक संचालकापासून जनमित्र पर्यंत सर्वजण थकबाकी वसुलीसाठी थेट मैदानात उतरले असून थकबाकीदारांची वीज खंडीत करण्याची कारवाई यापुढील काळात आणखी तीव्र करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंतेच नव्हे तर तांत्रिक कर्मचा-यांसोबतच लेखा आणि मानव संसाधन विभागातील पुरुष आणि महिला कर्मचारी देखील या मोहीमेत सहभागी होत थकबाकीदार ग्राहकांपर्यंत जाऊन वीजबिल भरण्याचे आवाहन करीत आहेत, सोबतच वारंवार आवाहन करून देखील वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन पर्यायाचा वापर करून आपले वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात येत आहे.

थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी खंडीत करण्याची मोहीम महावितरणकडून सुरु करण्यात आली आहे. मागील कांही दिवसांत अनेक ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी भरून, महावितरणला सहकार्य केले असले तरी टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. रक्कम कितीही असली तरी एका महिन्याचे वीज बिल थकल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी वेळेत भरून होणारी कटू कारवाई टाळावी, असे महावितरणतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बोकारा ग्रामपंचायतीने भरली एकरकमी 10 लाखांची थकबाकी

Wed Feb 14 , 2024
नागपूर :- डिसेंबर 2019 पासून वीजबिलापोटी थकीत असलेल्या 11.30 लाखांपैकी 10 लाखाचा एकरकमी भरणा करीत बोकारा ग्रामपंचायतीने महावितरणच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद दिला आहे. महावितरणच्या सावनेर विभाग आणि खापरखेडा उपविभाग अंतर्गत असलेल्या बोकारा ग्रामपंचायतीने डिसेंबर 2019 पासून वीजबिलांचा भरणा केलेला नव्हता, या ग्रामपंचायतीच्या नावे दोन वीजजोडण्या असून त्यावर जानेवारी 2024 पर्यंत 7 लाख 82 हजार 880 आणि 3 लाख 49 हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com