विधृत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी

कन्हान : – पासुन उत्तरेस ७ किमी अंतरावर बोरी (बोरडा) शेत शिवारातील विलास नान्हे हयानी ५ एकरात गव्हाच्या उभ्या पिकात विधृत खंब्याच्या तारा एकमेकाना लागुन झालेल्या स्पार्कच्या ठिणग्या पडुन  एकाएक आग लागुन आगीत गहु पिकाची राखरांगोळी झाली. परिसरातील शेतक-यांनी व प्रशासन अधिकारी कर्मचा-यांनी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने परिसरातील शेतक-यांची मोठी हानी टळली.
        मंगळवार (दि.२२) मार्च २०२२ ला दुपारी बोरी (बोरडा) शिवारातील मारोती वाघमारे यांचे ५ एकर शेत शेतकरी विलास नान्हे हयानी बटई ने करून त्यात गहु लावला होता. आज शेता जवळच्या विधृत खांबा च्या विधृत तारा एकमेकाना लागुन झालेल्या इलेक्ट्री क स्पार्क च्या ठिणग्या शेतात पडुन दुपारी अचानक शेतातील उभ्या गव्हाच्या पिकास आग लागल्याचे परि सरातील शेतक-यांना दिसताच आरडाओरड करून गावक-यांना एकत्र केले. गट ग्रा प खेडी (बोरी) च्या सरपंचा छाया कोकाटे व उपसरपंचा संगिता देवराव इंगोले हयानी तहसिलदार, पोलीस स्टेशन, पटवारी, अग्निशामक ला माहीती देऊ न घटनास्थळी बोलविले. परिसरातील शेतकरी, ग्राप पदाधिकारी, प्रशासन अधि कारी, कर्मचारी व ग्रामस्थानी तातडीने मदत कार्य करून दोन अग्निशामक बंब च्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यत विलास नान्हे च्या ५ एक रातील उभे गव्हाचे पिक आगीने जळुन राखरांगोळी झाली. परंतु आजुबाजुच्या शेतातील गव्हाचे पिक वाचविण्यात यश आल्याने मोठी हानी टळली. ग्रा प सदस्य हरिचंद्र तिरोडे, प्रकाश कोकाटे, रमेश कोकाटे, पो पाटील संदीप नेऊल, अनिल ऊके सह ग्रामस्थ शेतकरी आणि कन्हान पोलीस, अग्निशामक कर्मचारी , मंडळ अधिकारी बी जी जगधने, जे जी मेश्राम, डेकाडे तलाठी एस व्ही पलादूरकर, आर सावाईतुल, एम दुधे, भोसले, भारती वर्मा तसेच कोतवाल शालीक शेंडे आदीने घटनास्थळी पोहचुन सायंकाळ पर्यंत  बचाव कार्य केले. घटनास्थळी शेतकरी विलास नान्हे यांचे ५ एकरातील उभे गव्हाचे पिक आगीत जळुन राखरांगोळी झाल्याने शेतक-यांच्या तोंडी आलेला घास आगीने हिसकाविल्याने झालेली नुकसान भरपाई पिडीत शेतक-याला शासनाने तातडीने दयावी अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत सध्या 35 कोटींची तरतूद - आदिती तटकरे

Wed Mar 23 , 2022
  मुंबई : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत सध्या 35 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेत मुदतठेव स्वरूपात गुंतवण्यात आले असून त्यावरील मिळणाऱ्या व्याजामधून राज्यातील पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात वारसांना मदत करण्यात येत आहे असे माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी सांगितले.             याविषयी विधानसभेचे सदस्य रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com