टेमसना,परसाड,शिवणी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील टेमसना,परसाड व शिवणी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर होऊन 26 जून 2024 ही नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख होती या निवडणुकी करिता शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कामठी यांच्या कार्यालयात शेवटच्या दिवशी टेमसना सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 13 नामनिर्देशन पत्र,परसाड सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी 12 नामनिर्देशन पत्र तसेच शिवणी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी 13 नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.

सदर परसाड सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीकरोता एकूण 13सदस्य निवडुन द्यायचे असून टेमसना व शिवणी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी 13 सदस्य निवडून द्यायचे आहे.शेवटच्या दिवशी वरील वरील तिन्ही सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळाकरिता फक्त अनुक्रमे 12,13,13 नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. या व्यतिरिक्त विरोधी पक्षाकडून या निवडणुकीसाठी कोणतेही नामनिर्देशन पत्र सादर न झाल्यामुळे वरील तिन्ही सेवा सहकारी संस्थांची निवडणूक अविरोध झाली.

सदर टेमसना,परसाड,शिवणी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका अविरोध करण्याकरिता माजी मंत्री सुनीलबाबू केदार, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,यांच्या कुशल नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे, उपसभापती कुणाल इटकेलवार,संचालक सुधीर शहाणे,रमेश गोमकर ,बाजार समितीचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनार्थ निवडणूक अविरोध करण्यात आले.याप्रसंगी युवराज शहाने, नानाजी झाडे,मनोज कुथे,सोनु कुथे,महादेवराव कोरडे,अशोक शहाने व अशोक राऊत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घराच्या दाराचे व आलमारीचे कुलुप तोडुन सोन्याचे दागिन्याची चोरी

Thu Jun 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- रामनगर तिवाडे ले-आऊट येथिल रहिवा सी राजेंद्र हटवार हे बाहेर गावी गेले असल्याची संधी साधुन त्याच्या बंद घराचे कुलुप तोडुन घरातील आल मारीतील सोन्याची अंगठी व नथ असा अठरा हजार रूपयाची चोरी केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून पो स्टे कन्हान ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. राजेंद्र नामदेवराव हटवार वय ५५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com