– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 24 :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव 75 व्या वर्षानिमित्त 75 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचा संकल्प प्रभाग क्र 16 चे नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी केला असून आज श्री शिवछत्रपती महाराज जयंतीचे औचित्य साधून आज प्रभाग क्र 16 येथे 87 वर्षीय माजी सरपंच प्रल्हाद चव्हाण व 87 वर्षीय ज्येष्ठ महिला डोनारकर यांचा आमदार टेकचंद सावरकर व माजी जी प सदस्य अनिल निधान तसेच नगरसेवक प्रतीक पडोळे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला असून यानंतर इतरही ज्येष्ठ नागरिकांचा टप्प्याटप्प्याने सत्कार करून स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे.
याप्रसंगी, नविन कोडापे, पवन लांडगे, आदित्य बढेल,लखन पाल,कुणाल रंधई,साहिल गणवीर,अंकुश मेश्राम, विक्की वाघ आदी उपस्थित होते.