आठ वर्षीय मोहम्मद अरहम अब्बासने ठेवला जीवनातील पहिला रोजा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील हुसैनाबाद चौक रहिवासी इमरान हैदर यांच्या आठ वर्षोय चिमुकल्या मो अरहम अब्बासने आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. मो अरहम अब्बासने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे.

जनहितासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून मो अरहम अब्बासने साश्रु नयनाने साकडे घातले आहे .तर या चिमुकल्याने पहिला रोजा ठेवल्याबद्दल मो अरहम अब्बास याचे आई, वडील,व कुटुंबिया कडून सर्वत्र कौतुक होत आहे.

मुस्लिम समाज रमजानच्या पवित्र महिन्यात उपासनेला विशेष महत्व देतो .मुस्लिम समाजातील पाच मुख्य घटकामध्ये कलमा पठण, नमाज,उपवास ,जकात ,हज करणे हे प्रमुख घटक आहेत.इस्लाम मध्ये रमजान हा सर्वात पवित्र महिना मानला जातो.हा महिना चंद्र पाहून ठरविला जातो.मुस्लिम धर्माचे लोक या रमजानच्या संपूर्ण महिन्यात उपवास ठेवतात आणि सुर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत काहीही खात नाही .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नितीन गडकरी यांनी जोशपूर्ण वातावरणात दाखल केला उमेदवारी अर्ज

Wed Mar 27 , 2024
– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती : संविधान चौकातून निघालेल्या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग नागपूर :- नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी जोशपूर्ण वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights