नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार ता. 15) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मे. चावला किराणा स्टोर्स यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नियम 2006 अंतर्गत प्लास्टिक बंदीची कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गणेश डिस्पोसल यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नियम 2006 अंतर्गत प्लास्टिक बंदीची कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे लग्न समारंभातील जेवण/फुड़़स रस्त्याच्या कडेला पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. संस्कृत क्लासेस यांच्यावर परवानगीशिवाय अनधिकृतपणे विद्युत खांबावर बॅनर/ होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.