रद्दी विक्रीसाठी 12 फेब्रुवारीपर्यंत दरपत्रक आमंत्रित

नागपूर :- जुन्या वर्तमानपत्राची रद्दी आहे त्या स्थितीत विक्री करावयाची असल्याने माहिती व जनसंपर्क कार्यालयातर्फे इच्छुक खरेदीदाराकडून दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे. सदर दरपत्रक 12 फेब्रुवारी 2024 रोजीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहे.

दरपत्रकाबरोबर अनामत रकम रुपये 500 जमा करणे बंधनकारक असून नामंजूर झालेल्या दरपत्रकधारकांना अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे. प्राप्त दरपत्रक संबंधितांसमोर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी चार वाजता उघडण्यात येतील. यासंबंधीच्या अटी व शर्ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जुने सचिवालय, सिव्हील लाईन येथे कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी वर्तमानपत्राची रद्दी खरेदीसाठी आपल्या निविदा सादर कराव्या, असे आवाहन सहायक संचालक पल्लवी धारव यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा - डॉ.पी.पी. वावा

Thu Feb 8 , 2024
चंद्रपूर :- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य मा.डॉ.पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली ७ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महानगरपालिका राणी हिराई सभागृह येथे सफाई कर्मचारी यांच्या विविध विषयांवर आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न नियमानुसार मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीस डॉ.वावा यांच्यासह सल्लागार नाथ,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,बल्लारपूर, ब्रह्मपुरी,मुल नगर परिषद यांचे मुख्याधिकारी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com