पीएलजीए सप्ताह दरम्यान अहेरी उपविभागातील नागरिकांकडुन भरमार बंदुका पोलीसांचे स्वाधिन.

गडचिरोली

 

दिनांक 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 रोजी होणा­या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांचे नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन, उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीतील नागरिकांनी 08 भरमार बंदुका व 1 बॅरल पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. .

गडचिरोली जिल्ह्रात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवुन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतुन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीतील मौजा गट्टेपल्ली, रापल्ले, येरमनार, येरमनार टोला चंद्रा व कुडकेली गावातील नागरिकांनी त्यांचेकडे बाळगलेल्या 8 भरमार बंदुका व 1 बॅरल दिनांक- 5 डिसेंबर 2022 रोजी मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख  व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या समक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथे स्वाधिन केल्या. नागरिकांनी स्वेच्छेने त्यांचेकडील बंदुका स्वाधिन केल्यामुळे, बंदुका स्वाधिन करणा­या नागरिकांचा अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे नेतृत्वात उपपोस्टे पेरमिलीचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि. सोनवणे, पोउपनि. अंिजंक्य जाधव, नापोशि/ केशव गुरनुले, पोशि/ राहुल खारडे, पोशि/ब्रिाजेश सिडाम, पोशि/ राकेश उरवेते, पोशि/पंकज दंडिकवार, पोशि/सुरज करपेत व उपपोस्टे पेरमिलीचे पोलीस पथकांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीला बळी पडले निर्दोष बापलेकी..

Mon Dec 5 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साई मंदिर आडा पुलियासमोरून अवैधरित्या गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी कामठी कडे भरधाव वेगाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचलकाने पोलिसांच्या वाहनाला कट देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान पोलिसांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com