कोदामेंढी :- येथील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सत्तांतर झाले. तीन वर्षांपूर्वी अरोली -कोदामेंढी जि.प.क्षेत्र तर सहा महिन्यापूर्वी कोदामेंढी ग्रा.पं.भाजपा कडून कांग्रेस ने आपल्या ताब्यात घेतले. मुख्य रस्त्यांवरील खड्डे हा प्रचाराचा एक मुख्य मुद्दा होता. मात्र आजही मुख्य रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असून , उलट त्यांच्या आकार वाढत असून कोदामेंढीतील गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
अतिवृष्टी झाली की पिकांची आणि रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.मागील वर्षी आणि यंदा देखील अतीवृष्टीचा फटका मौंदा तालुक्याला बसला. अतीवृष्टी आणि त्यातच जड वाहतुकींमुळे रस्त्याची दुर्दशा झाली.दरवर्षी पावसाळ्यानंतर कोदामेंढीच्या मुख्य रस्त्याची ढिगळ लावून डागडुजी केल्या जात होती.मात्र यंदा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत या रस्त्याची ढिगळ लावून डागडुजी करण्यात आली नाही.रामटेक भंडारा रस्त्याला लागून बंगला चौकापासून केवळ एक किलोमीटर अंतराच्या कोदामेंढी येथिल मुख्य रस्त्या आहे.नेहमी रहदारीचा असलेला हा रस्ता आहे. किंत्येकदा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत या रस्त्यावर डांबराचे ढिगळ लावून डागडुजी केली जात होती.दोन वर्ष अतिवृष्टीचा फटका देखील बसला.रस्ताला ठिक ठिकाणी मोठे मोठे भगदाड पाडलेले आहेत.बरयाच ठिकाणी गिंटी उखडलेली आहे.पाऊस आला की पावसाचे पाणी साचल्याने डबके पहायला मिळतात.रस्त्याची खस्ता हालत पाहून जानारे येणारे वाहनधारक मनःस्ताप व्यक्त करतात.
गावात सर्वंच राजकीय पक्षांचे मोठे मोठे नेते असून देखील गावातील मुख्य रस्त्यांची ही दुर्दशा अशी टोचक टीका करतात.
तिन वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री तथा सावनेर क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांची जिल्हा परिषदेचे सदस्य योगेश देशमुख यांच्या प्रचाराची सभा याचं रस्ता चा कडेला झाली होती. रस्ताची दुर्दशा पाहून त्यांनाही राहावले नाही.योगेश देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आणि निवडून येताच या रस्त्याच्या बांधकामा करीता एक कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याचे रोखठोक बोल सुनील केदार यांनी मंचावरून केले होते.त्यामुळे जनता देखील चांगला आणि सूशोभित रस्ताचे स्वप्न डोळ्यात पाहू लागले.तिन वर्षांचा कालावधी लोटून गेला.मात्र अद्यापही मुख्य रस्त्यांवरील खड्डे मात्र कायम आहेत.