चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका कर विभागाअंतर्गत विशेष पथकांनी थकबाकी असलेले दोन मार्केट गाळे सील केले आहेत. सदर दोन्ही गाळे मनपाच्या मालकीचे असुन त्याचा वापर करण्यात येत नव्हता. दोन्ही गाळे राजकला मार्केट येथील असुन मार्केट मधील वरच्या मजल्यावर असलेले गाळा क्र. ४A / ७७ यावर रुपये ६,३३,८९० ची थकबाकी आहे. तसेच किशोर हुड गाळा क्र. गाळा क्र. १३१३/४ यांच्याकडे रुपये १,७९,२२९ वसुली आहे. सदर गाळेधारकांना मनपातर्फे वारंवार सुचना देण्यात आल्या. मात्र त्यांनी कराचा भरणा न केल्याने दोन्ही गाळे सील करण्यात आले.गाळे सील करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी गाळेधारक गुंजन बाफना यांच्यातर्फे मेंढे यांनी रुपये २,७१,४५० चा धनादेश देऊन सील प्रक्रिया टाळली.
सदर कारवाई दरम्यान सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, कनिष्ठ अभियंता नरेंद्र पवार, आशीष भारती, लक्ष्मण आत्राम, प्रशांत पिंपळकर, मयुर मलिक, संजय बनकर, हंसराज येरेवार व अतिक्रमण कर्मचारी उपस्थीत होते. जप्तीची कारवाई टाळण्यास त्वरीत कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फ़े करण्यात येत आहे.