संदीप कांबळे, कामठी
– महाराष्ट्रातील विविध साधकांचा सहभाग
कामठी ता प्र 29:-विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे 19 एप्रिल पासून दहा दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हे शिबिर 19 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आले होते व विपश्यनाचे सहाय्यक आचार्य यांनी शिबिराला मार्गदर्शन केले. आज सकाळी नऊ वाजता ‘मंगल मैत्री’ने दहा दिवसीय ध्यान शिबिराचे समारोप करण्यात आले .
कोरोना प्रादुर्भावा नंतर जनेवारी 2022 पासून नियमित 10 दिवसीय,3 दिवसीय व एक दिवसीय ध्यान शिबिराचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्याप्रमाणे पुढील 10 दिवसीय शिबिर हे 19 मे ते 30 मे, 18 जून ते 25 जून, 13 जुलै ते 24 जुलै,18 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट, 8सप्टेंबर ते 18 सप्टेंबर, 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर आयोजित करण्यात आले आहे. तसेच तीन दिवसीय शिबिर हे 05 मे ते 8 मे, 02 जून ते 05 जून, 1 जुलै ते 4 जुलै, 06 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट, 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर, 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर,27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत सुनिश्चित आहेत.दर पौर्णिमेला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ध्यान शिबिरात सहभागी होणाऱ्या इच्छुक व्यक्तिद्वारे http://forms.gle/HWfPAahSQKXLnRw3Aया लिंकवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.ओगावा सोसायटी ने ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून ध्यान शिबिर करण्याकरिता अर्ज प्राप्त होत आहेत.परंतु सध्या परिस्थितीत असलेल्या अर्जापैकी फक्त 50 साधकांना ध्यान शिबिर करण्याची परवानगी देण्यात येत आहे.नागपूर जिल्हा व्यतिरिक्त अकोला, अमरावती, मुंबई येथील साधक मोठ्या प्रमाणात ध्यान शिबिरात सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेत असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पल व ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी दिली आहे.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे ‘मंगल मैत्री’ने 10 दिवसीय ध्यान शिबिराचे समारोप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com