– लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
– पथनाट्य, लघुनाटीके घ्या माध्यमातून महामानवाच्या जीवन प्रसंगाला उजाळा
कोंढाळी/काटोल :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून संविधानाचे प्रारूप,महाडचे चवदार तळे,अस्पृश्य नायनाट करण्यासाठीचां संघर्ष, करून भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित केले. त्यानंतर भारतीय संविधानातील ३९५ कलमांबाबद विद्यार्थ्यांनी भाषणातून माहिती दिली. सोबतच संगितमय भीम गीताचे गायन, प्रश्न मंजुषा सह विविध कार्यक्रमांचे माध्यमातून भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संघर्षांना अधोरेखित केले.या कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
विदयार्थ्यांनी अभ्यास दिनचर्या करावी -प्राचार्य सुधीर बुटे
विदयार्थ्यांचे प्रथम कर्तव्य शिक्षण हेच असल्याने आपल्या दिनाचर्येंत अभ्यासाला प्राधान्य देऊन त्यात आवड निर्माण केल्यास जीवनातील उच्च ध्येय निश्चितपणे प्राप्त करता येते.याकरिता सतत्यता, मनाची तयारी मोलाची असल्याचे महत्वपूर्ण विचार प्राचार्य सुधीर बुटे यांनी व्यक्त केले
गुणवंत व शिस्तप्रिय विद्यार्थ्यांचे कौतुक – दुर्गाप्रसाद पांडे
सामाजिक कार्यकर्ता दुर्गा प्रसाद पांडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्यांची सविस्तर माहिती देतांना विद्यालयाचे विविध क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सुयश व शिस्त बाबत कौतुक केले. जीवनात नवनिर्मिसाठी बुद्धी बरोबर संघर्षाची जोड हवी असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानांनेच आज स्वातंत्र्य,समता, बंधुता,न्याय आदिमुळे देश संविधानामुळे एकसंघ आहे. असे विशेष अतिथी पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी उप मुख्याध्यापक कैलास थुल, पर्यवेक्षक मनोज ढाले, परिक्षा प्रमुख संजय आगरकर,सुनील सोलव, प्रिया धारपुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन भूमिका पोकळे, अदिती पिसे, तर आभार मनस्वी दारव्हेकर हिने मानले. बक्षीस व सत्कार कार्यक्रम कार्यक्रम संयोजिका चेतना ढोकणे, समन्व्यक तथा सामाजिक उत्सव समिती प्रमुख यशोदा नासरे, विशेष सहकार्य राहुल रक्षित, हर्षवर्धन ढोके, शुभम राऊत,मोहिनी भक्ते, सोनम माहेश्वरी योगिता कांबळे आदिसह शिक्षक व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विभागातून जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करणार्याशिक्षक व विद्यार्थ, विद्यार्थ्यांनी तसेच14 एप्रील रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रम सफलतार्थ उपस्थित सर्व शालेय विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ही प्राचार्य सुधीर बुटे यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल संस्थेचे वतीने आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली.