नागपुर : – प्रभाग क्रमांक १३ मधील कमलानगर, काचीमेट, संजयनगर, पांढराबोडी, अंबाझरी ई. पश्चिम नागपुरातील वस्त्यांमधे ऊन्हाळ्याच्या सुरवातीलाच कमी पाण्याचे प्रेशर असल्याने नागरीक फार परेशान आहेत. नागपुरच्या कडाक्याच्या ऊन्हाळ्यात सगळ्यांनाच पाणी लागते व प्रेशर नसल्यास कामकरी नागरिकांचा महत्वाचा कामाचा वेळ पाणी भरण्यातच जातो व त्यामुळे येथील नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
या प्रभागाच्या कर्तव्यात दक्ष माजी नगरसेविका डाॅ.परीणीता फुके यांनी मनपा आयुक्त बी.राधाकृष्णन यांची या आंदोलकांसोबत भेट घेतली व या वस्त्यांमधील पाणी वितरण ताबडतोब व्यवस्थित करावे अन्यथा तुम्हाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल याची जाणीव करुन दिली.आयुक्त राधाकृष्णन यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांच्या पाणी प्रश्नाकरता माजी नगरसेविका डॉ.परिणीता फुके धडकल्या आयुक्त कार्यालयावर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com