नागपुर : नगरसेविका डाॅ. परीणीता फुके नेहमीच फार महत्वाचे विषय महानगरपालीकेच्या सभेत पोटतिडीकेने मांडतात व त्याची सोडवणुकही करतात.आज दि.२५ जानेवारी २०२२ रोजी नागपुर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभे मध्ये नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांनी जुने कागदपत्रे व दस्तऐवजांचे स्कॅनींग व त्याचे डिजीटलायझेशन हा विषय लावुन धरला.जुनी प्रमाणपत्रे, दस्तऐवज व ईतर महत्वाची कागदपत्रे जपण्यास व हाताळण्यास कठीण झाली आहेत. ऊदाहरण द्यायचे झाल्यास रामनगर महानगरपालीकेची शाळा सन १९४४पासुन अस्तित्वात आहे. तेथील दस्तऐवज ईतके जीर्ण झाले आहेत की आता हात लावताच ते तुटुन, गळुन पडतात. हे एक ऊदाहरण झाले. नागपुरात अशा महानगरपालीकेच्या ब-याच जुन्या शाळा आहेत. तेथील दस्तऐवज हे कागदी स्वरुपात असल्याने जीर्ण झाले आहेत व त्यामुळे ते सांभाळणे व हाताळणे कठीण झाले आहे.तरी या व यापुढील सर्व दस्तऐवज व प्रमाणपत्रांचे स्कॅनींग करुन ते डिजीटलाईज करावे अशी मागणी नगरसेविका डाॅ.परिणीता फुके यांनी आजच्या महानगरपालीकेच्या सभेत जोरकसपणे मांडली. आजच्या अत्याधुनीक संगणक युगात हे फार सुलभ आहे फक्त ते करण्याची ईच्छाशक्ती व पैशाचे पाठबळ हवे.
आशा करुया हे लोकोपयोगी काम महानगरपालीका हातात घेईल व पुर्णत्वास नेईल.
नगरसेविका डाॅ. परीणीता फुके नेहमीच फार महत्वाचे विषय महानगरपालीकेच्या सभेत पोटतिडीकेने मांडतात व त्याची सोडवणुकही करतात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com