नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. नागपूर शहरातील संविधान चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी शहर संघटनमंत्री सुनील मित्रा, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव सतीश शिरसवान, शहर सचिव ॲड. राहूल झांबरे, अनुसूचित जाती मोर्चा सहपालक बंडू शिरसाट, शंकरराव मेश्राम, इंद्रजीत वासनिक, रोशन बारमासे, संजय जानवे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूत्व ही चतुःसूत्री देतानाच देशाच्या एकता आणि अखंडतेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचे व्यक्तिगत स्वातंत्र्य संविधानाच्या माध्यमातून परिभाषित केले. या संविधानामुळेच १२५ कोटी लोकसंख्येचा देश आज एकसंघ राहून जगाच्या परिप्रेक्षात ज्या गतीने वाटचाल करीत आहे, हा सर्वार्थाने संविधानाचा विजय आहे, असे प्रतिपादन यावेळी ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.