संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक,आर्थिक,राजकीय, जलसंधारण इत्यादी बाबतचे प्रगल्भ विचार आंबेडकरी विचारधारेच्या तरुणांनी घरोघरी पोहोचवावे व सामाजिक प्रबोधन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी योगदान द्यावे तसेच भारतीय संविधान हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून त्याचे प्रत्येकाने वाचन करून आपल्या अधिकार व हक्काबाबत जागृत व सतर्क राहावे व आपला सर्वांगिण विकास करून घ्यावा असे मौलिक व्यक्तव्य पूज्य भन्ते नागदीपंकर यांनी जयभीम चौक स्थित प्रज्ञा शील करुणा बोद्ध विहारात आयोजित रक्तदान व रोगणीदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्तचे औचित्य साधुन आज 10 एप्रिल ला जयभीम चौक स्थित प्रज्ञा शील करूना बुद्ध विहारात भव्य रक्तदान शिबिर व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून शेकडोच्या वर तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.या शिबिराला तिरपुडे ब्लड बँक जैन हॉस्पिटल च्या चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली.
आयोजित भव्य रक्तदान शिबिर व रोग निदान शिबीर यशस्वीरीत्या पार पडला असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञा शील करुणा बुद्ध विहार, महिला मंडल,जय भीम युवा मंच, प्रशिक आखाड़ा मंडल, प्रशिक वाचनालय, यशोधरा वाचनालय तसेच तिरपुडे ब्लड बँक जैन हॉस्पिटल च्या वतीने मोलाची भूमिका साकारण्यात आली.