संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पुज्य भदंन्त डाॅ आनंद कौसल्यायन यांचे बौद्ध धम्माच्या पुनर्निर्माण करण्याच्या वाटचालीत अतुलनीय योगदान राहिले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध पाली हिंदी साहित्यिक स्वतंत्र संग्राम सेनानी, हिंदी विश्वविद्यालय वर्धाचे प्रधानमंत्री, हिंदी भाषीक प्रान्तासह ईतर राज्यात हिंदीला प्रसारित करण्या सह भीक्खुसंघ स्थापित करून ऑल इंडिया.भिक्खु.संघ चे पुर्व संघानुशासक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर मिशन ला पुढे नेत असताना डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्धिक संपदेचे खरे वारस म्हणुन कर्तव्य तत्पर राहुन देशविदेशात बौद्ध धम्माची पताका प्रसारित करणारे धम्म ध्वजवाहक, बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार नागपुर चे संस्थापक अध्यक्ष परिनिबुंत पुज्य भदंत डाॅ भदंन्त आनंद कौसल्यायन हे प्रेरणादायक मार्गदर्शक म्हणुन प्रख्यात व्यक्तीमंत्व, लेखक उदबोधक चिंतक चिकित्सक यांनी लिहीलेल्या विविध ग्रथांचे पुण्रप्रकाशन करावे व भदंन्त डाॅ आनंद कौसल्यायन यांचे चैत्य पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवहान करण्यात येत असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.
डाॅ भदंन्त आनंद कौसल्यायन यांचा ११९वा जन्मदिन व बुद्धभुमी महाविहार चा ३९ वा वर्धापन दिन, चैत्य बाधकामाचा शुभारंभ बुद्धभुमी महाविहार डाॅ भदंन्त सावंगी मेधंनकर परीसर कामठी रोड नागपुर येथे संस्थान चे अध्यक्ष आदरणीय पुज्य भदंत सत्यशील महास्थविर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले कार्यक्रम चे उद्घाटन भदंन्त संघरत्न मानके अध्यक्ष पंय्या मेत्ता संघ यांनी केले प्रास्ताविक संस्थान चे सचिव भदंत प्रज्ञाज्योती महास्थविर यांनी केले ,संचालन भदंत नाग दिपंकर महास्थविर व आभार प्रदर्शन भदंत सिवनी बोधानंद महास्थविर यांनी केले
उपरोक्त कार्यक्रमास थायलंड चे भदंन्त महाप्रतिप सुखसेन, नेपाल चे भदंन्त मैत्रेय महास्थविर, श्रीलंकेतील भदंन्त गुणानंद अभिबु, भदंन्त यश, भदंन्त पंन्ना डाॅ नितीन राऊत, डाॅ सिद्धार्थ गायकवाड डाॅ सुरजीत कुमार सिंह डाॅ पुरणचद्र मेश्राम, डाॅ निरज बोधी, विलास गजघाटे, सुमेध रंगारी, सरीता रंगारी आदि मान्यवरांनी संबोधित केले उपरोक्त कार्यक्रमास मोठ्या संख्येत आदरनिय भीक्खुसंघ भीक्खुनी संघ उपासक व उपासिका उपस्थित होते कार्यक्रम च्या यशस्वीते करीता बुद्धभुमी श्रामनेर संघ व बुद्धभुमी धम्मसेवापथक,दायक दायीका सभा यांनी परिश्रम केले.