डॉ.अविनाश आचार्य एलएलबी परिक्षेत गुणवता श्रेणीत उत्तीर्ण

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विधी शाखे अंतर्गत घेतलेल्या एलएलबी परिक्षेत डॉ. अविनाश आचार्य यांनी सरासरी 9.09 श्रेणी अंक प्राप्त करीत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.

डॉ. अविनाश आचार्य हे महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन – विधी) या पदावर कार्यरत असून अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आणि व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर परिक्षा प्राविण्य श्रेणित उत्तीर्ण असलेले डॉ. आचार्य यांना यापुर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने व्यवसाय प्रशासन आणि व्यवसाय व्यवस्थापन या शाखेअंतर्गत सादर केलेल्या शोधप्रबंधाकरिता पीएचडी पदवी बहाल केली आहे. ‘2000 ते 2010 या कालावधीत महावितरणमधील प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी व आयोजन यांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि संस्थेच्या विकासावर त्याची प्रभावीता (Analytical study of desiging and conduction training programmes in MSEDCL from 2000 to 2010, and its effectiveness on the development of the organization) या विषयावरील त्यांच्या या शोधप्रबंधासाठी ही पदवी बहाल करण्यात आली आहे त्यांच्या या यशाबद्दल महावितरणमध्ये त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, 

प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१ वर्षात ४१५० तक्रारींचे निवारण, चांदा सिटी हेल्पलाईन ॲपला उत्तम प्रतिसाद

Mon Oct 30 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या ४१७२ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी ४१५० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी नागरीकांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com