‘महानिर्मिती’च्या अभियंता पदासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य शासनाच्या अंगीकृत वीज वितरण, महानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ व सहायक अभियंता पदाच्या भरतीची जाहिरात महानिर्मिती कंपनीमार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील गट अ आणि ब वर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. याबाबत ५ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सेवा प्रवेश नियमात ही सुधारणा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य चेतन तुपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, दीपक चव्हाण, छगन भुजबळ आदींनी सहभाग घेतला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

राज्य शासनाच्या सेवेत प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य तुपे, बच्चू कडू आदींनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गतिमानपणे मुंबईचा कायापालट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

Wed Dec 21 , 2022
नागपूर  : रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई मालमत्ताकर विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com