नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, नविन सुभेदार, ठवरे कॉलोनी येथे एक ईसम मोटरसायकलचे नंबर प्लेटवर काळी पट्टी लावुन वाहनावर संशयीतरित्या बसुन दिसून आला. त्याने जवळ जावून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आरोपी क. १) अमुल सतिश वाल्दे वय ३४ वर्ष रा. फेमस लायब्ररी जवळ, गड्डीगोदाम, नागपूर असे सांगीतले, त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ, एक लोखंडी चाकु मिळुन आला, त्याच वेळी बाजुला अंधारात लपुन असलेले त्याचे यार साचिदार मोटरसायकलने पळुन जावु लागले त्यांचा पाठलाग केला असता ते हुडकेश्वर म्हाळगी नगर रोडने, खरबी कडे जाणाऱ्या रोडने जात असतांना रिंग रोड वरील खरवी चौकाने पुढे नायरा पेट्रोल पंप जवळ त्यांचे वाहन अनियंत्रीत होवुन डिव्हाडरला धडकल्याने ते चारही ईसम वाहनासह रोडवर पडले. त्यापैकी एक इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेला तिन ईसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव आरोपी क. २) अतुल हिरालाल वर्मा वय २९ वर्ष रा. गाव धानी, ता. गुड, जि. रिवा ३) रोहीत तोतन घोश वय २४ वर्ष रा. पानागढ़ रेल्वे स्टेशन, शारदापल्ली कोलकत्ता, ह.मु., शिला नगर झोपडपट्टी, गिट्टीखदान, नागपूर ४) आदेश अंकुश मेश्राम वय २२ वर्ष रा. गोधनी, पिटेसुर, गोरेवाडा, नागपूर असे सांगीतले. त्यापैकी आरोपी क. ४ याला अपघातामध्ये पायाला गंभीर दुखापत झाल्याने मेडीकल हॉस्पीटल येथे अॅडमिट होता. आरोपी क. १ ते ४ यांचे ताब्यातुन ०२ लोखंडी चाकु, एक देशी बनावटीचा माउद्वार दोन जिवंत राऊंडसह, हॅण्डालोज, दोरी, मिर्ची पावडर, पेचकस, दोन मोटरसायकल, दोन मोबाईल फोन असा एकुण २,२२,४२०/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला होता. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे कलम ३१०(४), ३१०(५), २८१, १२५(व) भा.न्या.सं. सहकलम ३/२५ भा.ह.का, सहकलम १३५ म. पो.का, सहकलम १८४ मो.वा. का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. १ ते ३ यांना अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पाहीजे आरोपी क्षत्रदेव सींग तेज बहादुर सिंग वय २९ वर्ष रा. गाव रोर, ता. रायपुर, जि. रिवा (म.प्र) याचा शोध घेतला असता तो आरोपी अनील लिलाचंद सरजारे वय ४२ वर्ष रा. म्हाडा कॉलनी, कपीलनगर ह.मु. एकता कॉलनी, यादव नगर नागपुर, याचे घराजवळ मीळून आल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. गुन्हयाचे तपासात आरोपीतांचे घरून दरोडयात वापरण्या करीता उपयोगात येणारे वॉकी टॉकी संच, घातक हत्यारे, मोबाईल, कारतूस तसेच इतर साहीत्य जप्त करण्यात आले आहे. गुन्हयात आरोपीतांकडून एकुण ३,९४,३००/रू या मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे. तपासादरम्यान त्यांनी मागील महीन्यात लक्ष्मीनगर परीसरात सूध्दा एका ठीकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह.पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिवाजीराव राठोड अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) नागपूर शहर, रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परि. क. ०४), विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (अजनि विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि ज्ञानेश्वर भेदोडकर, पोनि नागेशकुमार चाप्तरकर, सपोनि भलावी, पोहवा, गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतन वैदय, तारा अंबाडारे, नापोअ विजय सिन्हा पोअ. मंगेश मडावी, हिमांशु पाटील, कुणाल उके, मपोअ. सारीका मिसार यांनी केली.