– शेकडोच्या संख्येने आढावा सभेत अधिकारी कर्मचारी उपस्थित
– सरपंचांचा आढावा सभेला प्रतिसाद
– शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींची आग्रही भूमिका
काटोल :-काटोल येथील महेश भवन येथे सरपंच मेळावा व विविध विकास कामाचा आढावा सभेकरिता माजी गृहमंत्री तथा काटोल नरखेड विधानसभेचे आमदार अनिल देशमुख यांनी गुरुवारला आढावा सभा घेऊन काटोल विधानसभा क्षेत्रातील विकास कामे अधिकाऱ्यांमार्फत जाणून घेतली व ज्या कामाला काही अडचणी आल्या असेल तर सरपंच तसेच ग्रामपंचायत सचिव यांच्यामार्फत रेकॉर्ड घेऊन जवळपास वीस विभागातील अधिकाऱ्यांना विकास कामात दिरंगाई खपून घेतली जाणार नाही अशा सूचना प्रसंगी देण्यात आल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ,अटल भूजल योजना, जलजीवन मिशन, विद्युत वितरण कंपनी, घरकुल योजना,वैद्यकीय बाबी, शेत पांदन रस्ते या गोष्टीवर विशेष प्रकाश टाकून अधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी काम करावे तसेच लोकप्रतिनिधींना गावाच्या विकासाकरता मदत करावी अशा सूचना प्रसंगी देण्यात आल्या. पांदन रस्ता दुरुस्ती बद्दल सरपंचांनी प्रसंगी विनंती केली.
आढावा सभेत काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत विविध विभागांतर्गत झालेल्या कामाचे डिजिटल सादरीकरण दाखविण्यात आले तसेच प्रस्तावित कामे लवकरात लवकर कशी होईल याबाबत सुद्धा आमदार अनिल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख तसेच काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी आपापले मत व्यक्त केले.
आढावा सभेमध्ये विविध विभागाचे अभियंता, अधिकारी तहसीलदार राजू रणवीर गटविकास अधिकारी डॉ.निलेश वानखडे यांनी लोकप्रतिनधीं यांचे समाधान केले.विविध विभागाचे कर्मचारी व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, जि.प. कृषी सभापती प्रवीण जोध, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, चंद्रशेखर कोल्हे ,रामदास मरकाम उपसभापती निशिकांत नागमोते माजी सभापती धम्मपाल खोब्रागडे ,अनुराधा खराडे, चंदा देव्हारे, लता धारपुरे ,अरुण उईके ,डॉ.अनिल ठाकरे,बाबाशेळके, निळकंठ ढोरे,अनुप खराडे, गणेश चन्ने तसेच सर्व पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार अनिल देशमुख यांनी सरपंच यांच्या प्रश्नाचे समाधान होतपर्यंत आढावा बैठक सुरू ठेवली तसेच उत्कृष्ठ आयोजन व्यवस्था केल्याबद्दल काटोल पंचायत समितीचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती संजय डांगोरे ,संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन सहा.गट विकास अधिकारी संजय पाटील यांनी केले.