२६३ परिवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिवाळीची भेट : संदीप जोशी यांचा महत्वाकांक्षी पुढाकार
नागपूर :- कोरोनामुळे घरातील कर्ता पुरूष गवामलेल्या भगीनींसाठी हक्काचा आधार ठरलेल्या श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारा संचालित ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’तर्फे शनिवारी २२ ऑक्टोबर रोजी २६३ परिवारांचे संवेदनशील दिवाळी मिलन आयोजित करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर येथील जेरील लॉन येथे सायंकाळी ७ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६३ परिवारांना दिवाळीचे फराळ आणि एक महिन्याचे अन्नधान्य प्रदान केले जाणार आहे. कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार प्रवीण दटके आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहतील.
सोबत पालकत्व प्रकल्पाचे अध्यक्ष तथा श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सोबत पालकत्व प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या २६३ परिवारांना अन्नधान्याचे किट, दिवाळीचा फराळ, रांगोळी, दिवे आदी देण्यात येणार आहे.
मागील वर्षी कोरोनाचे संकट असले तरी घरीच साधेपणाने साजरी करण्यात आलेल्या दिवाळीत प्रत्येक घरात आनंद होता. मात्र यावर्षी तो आनंद साजरा करण्याचे कारणच नियतीने हिरावून घेतले आहे. घरातील कर्ता पुरूष, महिला गेल्याने अनेक चिमुकले आई, बाबा किंवा दोघांनाही पोरके झाले आहेत. अशा स्थितीत नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी पुढाकार घेत या कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारत ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाची सुरूवात केली. सोबतने आतापर्यंत पालकत्व स्वीकारलेल्या २६३ परिवारामधील काही अपवाद वगळता बहुतांशी परिवाराने कर्ता पुरूषच गमावलेला आहे. अशात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेल्या भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे ‘सोबत’ परिवार उभा आहे. रक्षाबंधनाला याच भगिनींनी ‘सोबत‘च्या पदाधिका-यांना राखी बांधून ‘सोबत’ परिवारासोबत नात्याची गाठ घट्ट बांधली. ‘सोबत’ने परिवार म्हणून सोबतीला असलेल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी स्वीकारून त्यांना विविध माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
‘सोबत’ला साथ द्या ; दिवाळीचा आनंद द्विगुणित करा
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि चैतन्याचा सण. या सणानिमित्त आपल्या ‘सोबत’ परिवारातील सदस्य असलेल्या प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने सोबत प्रकल्पाचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी दिवाळी मिलनसाठी पुढाकार घेतला आहे. दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘सोबत’ला साथ देण्याचे आवाहन ‘सोबत’ मार्फत करण्यात येत आहे. पालकत्व स्वीकारलेल्या परिवाराला दिवाळीची भेट स्वरूपात देण्यात येत असलेल्या अन्नधान्य, फळार आणि दिवाळीच्या अन्य साहित्यांच्या किटची किंमत १५०० रुपये आहे. इच्छूक व्यक्ती एक किंवा त्यापेक्षा जास्तही परिवारांच्या आनंदाचे कारण ठरू शकतात. इतरांच्या चेह-यावर आनंद पसरवून दिवाळी अविस्मरणीय करण्यासाठी तत्पर असलेल्या इच्छूकांनी ज्योत्स्ना मोहन कुऱ्हेकर (9823043133), आनंद टोळ (9403759779), प्रणय मोहबंसी (9834149336), प्रकाश रथकंठीवार (9373048175), चेतन धार्मिक (8530441331) यांच्याशी संपर्क साधावा.
इथे करा मदत
श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारा संचालित ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’ अंतर्गत जबाबदारी स्वीकारण्यात आलेल्या परिवारांना मदत करू इच्छिणा-यांना थेट ‘सोबत’च्या बँक खात्यामध्येही मदत करता येईल. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट ‘सोबत’, आयडीबीआय बँक लिमिटेड, लक्ष्मीनगर शाखा, खाते क्रमांक 0663104000114363, आयएफएससी कोड IBKL0000663 येथे मदतराशी जमा करू शकता येईल.