कोषागार कार्यालयाच्या नावाने दूरध्वनी संदेश घेऊ नका, निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागाराचे आवाहन

नागपूर :- निवृत्तीवेतनधारकांना कोषागारामार्फत निवृत्ती विषयक, लाभ प्रदान करताना प्रदानाबाबत किंवा वसुलीबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नाही व ऑनलाईन व्यवहाराविषयी सूचित करण्यात येत नसून असे दूरध्वनी संदेश घेवू नये, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी केले आहे.

जिल्हा कोषागाराच्या अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना कोषागारामार्फत निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान, वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो, असे प्रसिद्धीपत्रात सांगण्यात आले आहे.

निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांस निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

सर्व निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरुन प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. निवृत्तीवेतनधाकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील. अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास अवगत करावे तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोर्शी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत करा !

Thu May 23 , 2024
– अटी निकष बाजूला ठेवून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी !  मोर्शी :- अवकाळी पाऊस, गारपीटमुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व जाचक अटी, निकष बाजूला ठेऊन मदत करण्यासाठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे. मोर्शी तालुक्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com