जिल्हा क्रीडा संकुल बांधकाम तातडीने पूर्ण करा- मंत्री सुनीलबाबू केदार

संदीप कांबळे,कामठी

– 24 कोटी रूपयाचा मंजूर निधीतील जिल्हा क्रीडा संकुल बांधकाम अजूनही कासवगतीने

कामठी ता प्र 1:- ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व कामठी तालुक्यातील उपेक्षित खेळाडूंची क्रीडा संकुलाची मागणी लक्षात घेत खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी शासनाने 29 मार्च 2016 ला 24 करोड रूपयाच्या मंजूर निधीतून कामठी तालुक्यातील शहरापासून 10 की मी दूर अंतरावरील गादा गावाच्या मार्गावर जिल्हा क्रीडा संकुलाचे काम उभारण्यात आले असून हे काम तीन वर्षात पूर्ण करून देणे होते.मात्र आजच्या स्थितीत बांधकामाला सुरू होऊन तीन वर्षेच्या वरचा कालावधी लोटून गेले तरीसुद्धा क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्णत्वास येईना त्यामुळे क्रीडा संकुला अभावी तालुक्यातील खेळाडूंची उपेक्षा होत आहे .तर तालुक्यातील राज्य पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची सरावासाठी परवड होत असल्याने तालुक्यातील क्रीडा प्रेमी मध्ये घोर निराशा दिसून येत आहे.यांसदर्भात राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनीलबाबू केदार यांनी गादा येथील कार्यान्वित असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल च्या बांधकामाची पाहणी केली. दरम्यान कासवगतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत संबंधित अधिकाऱ्याना धारेवर घेत जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाला गती देत लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करा असे फर्मान सोडले तसेच या क्रीडा संकुल मध्ये एनसीसी च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून आजचा तरुण उद्याचा सैनिक घडविण्याचा मार्गदर्शन मंत्री केदार यांनी केलेल्या मार्गदर्शक वक्तव्यातून केला.

याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक हुकूमचंद आंमधरे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, जी प सदस्य प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे , माजी नगराध्यक्ष शकुर नागानी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले की कामठी शहरातील क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास येथे क्रिकेट चे नामवंत खेळाडूं सी के नायडू यांचे जन्मस्थान आहे .येथील छावणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रब्वानी मैदानावर प्रशिक्षण पूर्ण करून विदेशात फुटबॉल मध्ये नावलौकिक मिळवनारा स्व.मुसताक पठाण यांनी सुद्धा कामठी शहराचे नावलौकिक केले तसेच काही काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत कामठीतील न्यू ग्लोबल क्लब च्या खेळाडूंनी जोरदार विजय प्राप्त केला होता या संघाचे प्रशिक्षक कोच कामठी चे श्यामलाल घोष यांच्यासारख्या महत्वपूर्ण खेळाडूंनी या शहरात राहून जीवणातील क्रीडा क्षेत्रात विजय प्राप्त केला आहे .कामठी तालुक्यात पूर्वी कबड्डी, खो खो तसेच कुस्ती , मल्लखंबासारखे खेळ खेळले जात होते. या खेळासाठी मराठा लोन्सर्स, प्रगतिमंडळ, सेव्हन स्टार क्लब, नागसेन क्लब,सुभाष मंडळ, , हरदास मंडळ आदी नावांनी मोठमोठ्या कबड्डीचे क्लब असायचे तालुक्यातील रुईगंज मैदान ,नागसेन नगर, हाकी बिल्डिंग समोर मैदान आदी ठिकाणी स्पर्धा होत होते, फुटबॉल स्पर्धा होत होत्या.मात्र आज या क्रीडा संकुला अभावी खेळाडूंची निराशा होत आहे तर आज 15 वर्षे लोटून गेले मात्र क्रीडा संकुल निर्माण करण्यास अपयश येत असल्याने खेळाडूंची मात्र कुचंबणा होत असून हा प्रकार तालुक्यातील खेळाडूंच्या भविष्याशी खेळ खेळणारा ठरत आहे.मात्र क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या अथक प्रयत्नाला यश येऊन लवकरात लवकर गादा येथील जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन क्रीडा तरुणांची होणारी कुचंबणा थांबेल असा विश्वास व्यक्त करीत या क्रीडा संकुलातून एनसीसी च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आजचे तरुण उद्याचे सैनिक घडविण्याचा या संकल्पनेबद्दल ना सुनीलबाबू केदार यांचे आभार मानले.

– गादा क्रीड़ा संकुल चे काम आज 2017 मधे सुरु झाले परंतु अजुन पर्यन्त ह्यांचे काम झाले नाही, गादा ग्रामपंचायत अंतर्गत 21 एकर जागेवर ह्या भागातील खेळाडूना लाभ मिळावे व अध्यावत क्रीड़ा संकुलसाठी 26 कोटी च्या निधितुन क्रीड़ा संकुल बनावे हयकरिता पाठपुरावा केला होता पहिल्या फैज मधे 9.5 कोटी अंदाजे निधितुन काम सुरु झाले होते तें काम आजपर्यत सुरु आहे, त्यां कामाची पाहणी मंत्री सुनीलबाबू केदार हयांनी केली. हयात फुटबॉल, हॉकी, 400 mtr चा रंनिग ट्रैक, इंदौर स्टेडियम अशे अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करून खेळाडूच्या सरावा साठी दया अशे आदेश मंत्री केदार यांनी अधिकाऱ्यांना दिले, तसेच उर्वरित जागेवर रायफल शूटिंग डोम, व प्रस्तावित काम लवकर करण्यात यावे अशे अधिकाऱ्यांना सांगितले, ह्यावेळी तहसीलदार अक्षय पोयाम यासह संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' विषयावर साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Fri Apr 1 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 1:- आगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पाश्वरभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1 एप्रिल ला सकाळी 11 वाजता देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला आणि परीक्षेच्या तणावावर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यातील वरंभा, जाखेगाव, चिकना आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी 11 वाजता सज्ज राहून मोबाईल वा टीव्ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!