दिल्ली, पंजाब व गुजरात प्रमाणे महाराष्ट्रात संघटन मजबूत केल्या जाईल – गोपाल इटालिया सहप्रभारी महाराष्ट्र
नागपूर :-आज नागपूर येथील पांडुरंग सभागृह येथे पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रामुख्याने महाराष्ट्राचे सह प्रभारी गोपाल इटालिया, डॉ देवेंद्र वानखडे, जगजीत सिंघ, अंबरीश सावरकर,अशोक मिश्रा, मनोहर पवार, डॉ जाफरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीदेआजम भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर देवेंद्र वानखेडे यांनी केले ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये दि. २८ मे ते ६ जून पर्यंत पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा काढली. त्यानंतर 12 ते 21 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्य संवाद सभा आयोजित करण्यात आल्यात. या सेभेच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद करण्यात आला. या माध्यमातून जनतेच्या अनेक समस्या समोर आल्यात. आता आपल्याला जनतेच्या समस्यांवर कार्य करायचे आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना गावागावात आणि गोरगरीब जनतेपर्यंत रुजविण्याकरता पुढील नियोजनासाठी आजची बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचे डॉ. देवेंद्र वानखडे यांनी प्रस्तावीकातून नमूद केले.
त्यानंतर नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश रेवतकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, भंडारा जिल्हा अध्यक्ष स्वप्नील भोंगडे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष उमेश दामये, वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रमोद भोंबले, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकले, नागपूर महानगर अध्यक्ष कविता सिंगल, व चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी आपल्या जिल्ह्यात चालू असलेल्या पार्टी गतीविधीचा आढावा सर्वांच्या समोर ठेवला. सोबतच सर्व जिल्ह्याचे संघटन मंत्री शंकर इंगोले, प्रा गान्द्लेवर आणि जिल्हा सचिव, महिला अध्यक्ष व युवा अध्यक्ष यांनीही पार्टी वाढविण्यासाठी अनेक चांगल्या सूचना केल्यात.
यानंतर जगजीत सिंग यांनी जनतेचे ७५ वर्षात न सुटलेले प्रश्न म्हणजे आपल्या पार्टी चा जाहीरनामा आहे, त्यावर आपल्याला कार्य करायचे आपल्या संबोधनातू व्यक्त केले.
गुजरात राज्याचे माजी राज्य अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालिया यांनी गुजरात मध्ये जे संघटन निर्माण केलं होतं आणि गुजरातची निवडणूक लढवून आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात यश मिळविण्याकरिता जी पद्धत गुजरात मध्ये अवलंबित होती त्याच धरतीवर आता महाराष्ट्रात आपल्याला संघटन वाढवायचे. याची सुरुवात आपण विठूमाउलीचे आशीर्वाद घेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जावून केली आहे. आता मात्र आपण सर्व पदाधिकाऱ्यांना रात्रंदिवस मेहनत करावी लागेल. तसेच अनेक फुल टाइम कार्यकर्त्यांना जबाबदारी घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत च्या निवडणुकीत पार्टीला यश मिळविणे आवश्यक आहे. आपण सर्व मिळून महाराष्ट्र मध्ये मजबूत संघटन निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीत सर्व बलाढ्य पार्टी विरोधात निवडणुकीला सामोरे जावू हेच आपले ध्येय असावे असे प्रतिपादन गोपाल इटालिया यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर केशव बांधते व आभार प्रदर्शन श्री अशोक मिश्रा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता नागपूरच्या सर्व विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कार्य केले.