नेहरू युवा केंद्र अमरावती द्वारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन

अमरावती :-नेहरू युवा केंद्र अमरावती, युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारच्या वतीने मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती येथे 28 मार्च 2023 रोजी जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा युवा उत्सव सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी प्रसंगी सांगितलेल्या आपल्या भाषणातील अमृत कालच्या पंचप्राणावर आधारित होता. या युवा उत्सवाची थीम ‘नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना’ हि होती आणि त्या आधारावर हा युवा उत्सव अमरावती जिल्हात उत्सवामध्ये पार पडला. या युवा उत्सवात युवकांसाठी भारतातील स्थानिक चित्रकला परंपरा या विषयावर युवा कलाकार चित्रकला स्पर्धा घेण्यात आली,त्याच सोबत नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना ह्या विषयावर भाषण स्पर्धा आणि कविता लेखन स्पर्धा घेण्यात आली, त्याचबरोबर मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा,आणि सांस्कृतिक लोक नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता देशमुख, (प्राचार्य, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय), उदघाटक सुलभा  खोडके (आमदार) , प्रमुख अतिथी प्रफुल्ल शेळके(सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती), विजय संतान (उपसंचालक, क्रीडा व युवा विभाग), राजेंद्र रहाटे (जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड), प्रफुल देशमुख (सहायक अभियंता, MSEDCL) आणि जितेंद्र झा (लीड बँक मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया) उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व मातोश्री विमलाबाई देशमुख आणि  पंजाबराव देशमुख याच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच राज्यगीताने उदघाटन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर पतंगे यांनी केले . त्यांनी नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि उद्देश्याबद्दल युवकांना मार्गदर्शन केले,त्यांनी सांगितले की प्रत्येक देशाच्या विकासाचा कणा हा युवक आहे युवाशक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. देश विकासात युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे जगात भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असून त्यांचे मुख्य कारण या देशांमध्ये युवकांची संख्या मोठी आहे. प्रत्येक युवकाने मला देशाने काय दिले हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय केले ही भूमिका स्वीकारून देशाच्या सर्वांगीण विकासात हातभार लावावा असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर पतंगे यांनी केले. तसेच सुलभा खोडके (आमदार) यांनी आपल्या भाषणात सांगितले नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना जिल्हा,राज्य व राष्ट्र पातळीवर वाव मिळत आहे. अमरावती नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अत्यंत चांगले कार्य सुरू आहे.

तसेच युवकांनी आपल्या समाजा प्रती जागरूक व्हावं आणि स्वतःच्या विकासा सोबत आपल्या गावाचे आणि समाजाचे विकास ही करावे अशे आवाहन कार्यक्रमांमध्ये उपस्थित प्रमुख अतिथी यांनी केले.

युवा उत्सवाची सुरुवात कला दर्पण बहुद्देशीय संस्था च्या नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना ह्या विषयावर पथनाट्य ने झाली.

स्पर्धा झाल्यानंतर सर्व परीक्षकांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक निखिल विल्हेकर ह्यांनी पटकावला तर दुसरा क्रमांक सौरभ देशमुख आणि तिसरा क्रमांक अनुराधा आंबेडकर यांनी पटकावला. समूह लोकनृत्य स्पर्धेत श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय च्या पथकाने पहिला क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक R.D.I.K महाविद्यालय, बडनेरा च्या चमूने पटकावला, तिसरा क्रमांक अनुराधा नृत्य कला मंदिर च्या पथकाने पटकावले. कविता लेखन स्पर्धेत पाहिले स्थान सिया परिहर ने प्राप्त केले, दुसरे स्थान जुही वानखेडे तर तिसरे स्थान साक्षी वांगे ह्यांनी प्राप्त केले. वक्तृत्व स्पर्धेत पाहिले स्थान अभय तायडे, दुसरे स्थान हिमांशू पाटील तर तिसरे स्थान वैष्णवी ठाकूर ह्यांनी प्राप्त केले. स्मार्टफोन फोटोग्राफी स्पर्धेत पहिला स्थान तनिष्क तेलमोरे, दुसरे स्थान पार्थ सगाने आणि तिसरा स्थान साईम अल – हक ह्यांनी प्राप्त केले.

तसेच या युवा उत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी मा.डॉ.बोरकर (डायरेक्टर, विद्यार्थी कल्याण विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) बोलत असताना म्हंटले कि नेहरू युवा केंद्र हे युवकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने युवकांच्या कल्याणासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करीत आहे. तसेच समारोप प्रसंगी युवा उत्सवामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या युवक व युवतीना पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. युवा उत्सावाचे संचालन सुबोध धुरंधर आणि मयूर वानखेडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर पतंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक साक्षी केवती, समीक्षा वडुरकर, सतीश वाघमारे, मोनिका इसाने, कांचन गवई, लोकेश गुप्ता, इरफान शाह, नरेंद्र घुरडे, स्नेहा वानखेड़े,नम्रता डोंगरे व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती येथील शिक्षक आणि गैर शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात लागले पक्षांसाठी... घरटे अन् जलपात्र

Thu Mar 30 , 2023
-पदार्थ विज्ञान विभागातील रासेयोचा उपक्रम नागपूर :-उन्हाळ्यात पक्षांची तृष्णा भागावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात त्यांच्याकरिता घरटे अन जलपात्र लावण्यात आले आहे. विद्यापीठ पदार्थ विज्ञान विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची सुरुवात वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीश पालीवाल यांच्या हस्ते घरटे व जलपात्र बांधून बुधवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com