चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सिनिअर सेपक टकरा ( मुले व मुली ) निवड चाचणी 2024

चंद्रपूर :- महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सिनिअर मुले व मुली खेळाडूंना कळविण्यात येते कि, ३४वी सिनिअर महाराष्ट्र राज्यस्तरीय सेपक टकरा (मुले व मुली) अजिंक्यपद स्पर्धा 09 ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान ठाणे येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचा संघ सहभाग करण्याकरिता सेपक टकरा असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक 28 जुलै 2024 रोजी ठीक सकाळी 10:00 वाजता इंडोर हॉल, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे.

सेपक टकरा असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना सोबत येताना 03 प्रत आधार कार्डची झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचे सेपक टकरा असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ ३४वी सिनिअर महाराष्ट्र राज्यस्तरीय सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धा, ठाणे येथे दिनांक 09 ते 11 ऑगस्ट 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार.

तरी इच्छूक खेळाडूंनी नरेश चंदेल (7769034966) हर्षल क्षिरसागर (7066916570), रुचिता आंबेकर (8552925066), स्वप्निल धोडरे (9309806706), रितिका रायपुरे (8999789110) अभिमन्यू आर्या (7020933248) यांच्याशी संपर्क साधावा.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुभान नगर येथील मल वाहिनीची दुरूस्ती सुरू

Tue Jul 23 , 2024
नागपूर :- पारडी येथील सुभान नगरमध्ये सोमवारी (ता. २२) सकाळी फुटपाथ खचले व त्यामुळे येथील मलवाहिनी बाधित झाली. याबाबत तात्काळ दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मनपाद्वावारे तात्काळ रस्त्यावर बॅरीकेडिंग करण्यात आले. तसेच लकडगंज झोनतर्फे पथदिवे देखील हटविण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे लकडगंज झोन तर्फे मलवाहिनीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com