यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

यवतमाळ :- जिल्ह्यात उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दि.७ मार्च रोजी हॉटेल हिरा पॅलेस दारव्हा रोड यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या गुंतवणूक परिषदेमध्ये राज्यशासनासोबत सामंजस्य करार होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे.

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे जिल्ह्यांना विकासाचा केंद्र मानून व राज्याच्या विकासाला चालना देणे तसेच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यय संधींबाबत चर्चा, सामंजंस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव कथन आदींचा समावेश असणार आहे.

प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याच्या उत्पादनाचे प्रदर्शन, निर्यातक्षम उत्पादने, भौगोलिक नामांकन असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, विविध योजनांचे लाभार्थ्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या गुंतवणूक परिषदेमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कलावंतांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

Wed Mar 6 , 2024
यवतमाळ :- जिल्ह्यातील राज्य शासनाच्या वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या मानधनधारक कलावंतांना डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात मानधन जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कलावंतांनी यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालकांच्या पत्रान्वये कलावंताचे मानधन हे दि.१ एप्रिल पासून डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व मानधनधारक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com