नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक ई. झेड. खोब्रागडे यांची ‘संविधानाची फलनिष्पती व स्वातंत्र्योत्तर भारत’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत https://youtu.be/SpqrqlzNBXY या मोबाईल लिंकवर गुरुवार दि. 16 डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी 4 वाजता प्रसारित होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. सायंकाळी वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल.
भारतीय संविधान, त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास, भारतीय संविधानाचे वेगळेपण, संविधानातील मुलभूत अधिकारांचे वर्णन, लोकशाहीच्या तीन प्रमुख स्तंभांची संविधानिक जबाबदारी, संविधानातील मुलभूत कर्तव्यांचा समावेश आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.खोब्रागडे या कार्यक्रमातून देणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.